थांब रे माझ्या मना

Submitted by _तृप्ती_ on 10 May, 2020 - 23:49

थांब रे माझ्या मना, का धाविसी दाही दिशा
उमलू दे पाकळी अन उमटु दे तांबडी ही प्रभा
का शोधीसी रानीवनी सूर कुठला पाव्यातला
शांत चित्त नयनी तुझ्या सापडेल निळा सावळा
मेघ दाटले नजरेत तुझ्या धूसर भासते भवताल
सैरभैर तू होऊ नको ऐक तुझ्यातला झपताल
वाहते वारे जसे ते त्यापरी तू उगी वाहू नको
पाचोळा उड़तोच आहे, तू मातीला पारखू नको
निर्मळ जल हे वाहते कुठे, तो वाहता झरा तूच हो
तृष्णा तुझी अन तृप्ती तुझी उगा कोठे सांडू नको

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults