धीर...!

Submitted by _दयानंद_ on 7 May, 2020 - 06:52

अधिरतेच्या दोरीवरती
धीर जरासा डगमगला

धीराने मग धैर्य बांधुनी
प्रश्न मनाला विचारला

धीर बांधुनी का लभते तृष्णा
वा लभते माया दमडी

धीर बांधुनी विलंब सारा
त्याहूनि जड तो प्रश्नपसार

मौन चिरंतर मोडुनी हे मन
वदले धिरगांभीर्याने

मन हे वेडे मस्त मौजिरे
जो नसता लगाम धीराची

धीर घडवितो माणूस सारा
धीर दावीतो नौकेस किनारा

धीर पिकवितो मातीतून मोती
धीर जुळवितो साथीतून नाती

धीर घडवितो निर्मळ दर्पण
धीरासव हा देहची अर्पण

तृप्त असे हे मन निरंतर
धीर साथीला जो असे चिरंतर..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults