छद्मवेषातील बेडूकतोंड्या

Submitted by संकेत नाईक on 6 May, 2020 - 04:32

तसे पाहायला गेलो तर माझे पक्षीमित्र खुप आहेत. पण आवर्जून  फोनवरून आज हा पक्षी पाहिला,  या पक्षाचे घरटे पाहिले, या पक्षाचे day roost  सापडले  असे सांगणारा एकच रमेश झर्मेकर. भगवान महावीर अभयारण्यास जोडून असलेल्या तांबडीसुर्ला येथील निसर्ग समृद्ध अशा nature's nest हे हाॅटेल भागिदारीने चालवतो.  हाॅटेलच्या नावाला शोभेल असा तो परिसर आहे. पशू-पक्षांचे माहेर घर म्हटले तरी वावगे ठरू नये. त्यामुळे तेथे निसर्गप्रेमीचे सदैव गर्दी असते.
माझी शाळा बोंडला अभयारण्यच्या पायथ्याशी आहे. त्यामुळे शाळेच्या आवारात  पक्ष्याबरोबर रमेशचे दर्शन हमखास होते.  भारतीय किंवा  विदेशी पक्षी अभ्यासकांना घेऊन तो यापरिसारात आपली दुर्बिण किंवा fild scop  घेऊन भ्रमंती करताना दिसतो. म्हादई, बोंडला आणि भगवान महावीर ही अभयारण्या त्याने  पिंजून काढली. सूर्योदयापासून सुर्यास्तपर्यंत आणि   सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत त्याला पक्षी पाहायचा छंद जडलेला आहे.
त्याच्या या छंदात मी सुद्धा माझी दुर्बिण गळ्यात अडकवून सामिल होतो. हसण्यावर नेऊ नका  पण मीही काही पक्षी ओळखतो.
गोव्यात 450 एवढे पक्षी पाहायला मिळतात.  पण विजेरीच्या साहाय्याने निशाचर  पक्षी पाहायची मजा औरच. गोव्यात चार प्रकारचे  निशाचर पक्षी सापडतात. घुबड,  पिंगळा, बेडूकतोंड्या आणि रातवा. बेडूकतोंड्या रमेशचा  प्रियतम. बेडूकतोंड्या पाहायला भाग्य लागते.  रमेशच्या सोबतीने तो मला पाहायचा भाग्य खूप वेळा आले.
बेडूकतोंड्याला इंग्रजी मध्ये sri Lanka frogmouth  or ceylon frogmouth  (batrachostomus monliger) म्हणतात. घनदाट किंवा विशिष्ट वनात सापडणारा हा सह्याद्री घाटाची शान  आहे. राखाडी-तपकिरी, लालसर-तपकिरी रंगाची ही नर-मादी झाडाच्या फांदीवर किंवा झूडूपात दिवसाढवळ्या बसलेला असतो.  सुर्य अस्ताला गेला कि जागी होतोत व सुर्योदयापूर्वी झोपी जातात. मोठमोठ्या वृक्षाखालील झाडाझूडपात छद्मवेषात बसलेला असतात.
सकाळी किंवा संध्याकाळी पाच वाजता विजेरी, दुर्बिण, ओडोमाॅस लावून रमेश बरोबर निघायचो  व थेट सातच्या सुमारास परतायचो. आणि हे दोन तास निर्जीव होऊन घनदाट जंगलात एका जागेवर बसून राहायचं. अंगावर लावलेल्या ओडोमोसचा वास तेवढा दरवळायचा,  डास आपले काम करीत होते. निशाचर पक्षीची खासीयत होती उठण्यापूर्वी व झोपण्यापूर्वी हे पक्षी आवाज करतात. आणि ह्याच आवाजासाठी आम्ही तासनतास बसायचो. एखाद्या वेळी आवाज आला की सदर ठिकाणावरील झाडे-झुडपे-वेली निरखून पाहायचो. एखाद्या वेळी दिसला तर नशीब नाहीतर पुन्हा दुसर्‍या दिवशी  निहाळण्यास तयार असायचो.
निशाचर पक्षांचे आणखी एक गुपीत होते. ज्या आवासात हे वस्तीला असतात ते ठिकाण ते सहजासहजी बदलत नाही. आणि असली गुप्तता अचूकपणे हेरण्याची सुप्त कलागुण रमेशला आहे. याचाच फायदा घेऊन  बेडूकतोंड्याचा day roost  शोधून काढतो. 
दुसर्‍या दिवशी पक्षी छायाचित्रकार मोठेमोठे कॅमेरा घेऊन वेगवेगळ्या कोनातून बेडूकतोंड्या नर व मादी एकमेकांना खेटून बसलेले  छाया काढतात. चांगले आलेले  फोटो ठेवतात व खराब झालेले फोटो सहज Erase  Ok म्हणतात. पण हाच छद्मवेषात असलेला बेडूकतोंड्या शोधून काढा म्हटल्यावर आठवण येते ती "रमेश झर्मेकर".

संकेत नाईक.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोलीवर स्वागत संकेत
बेडूक तोंड्या बघायला मिळाला / मिळतो म्हणजे खरोखरच भाग्यवान आहेस
पक्षी निरिक्षणावर , गोव्यावर लिहिलेले अजूनही वाचायला आवडेल.

मी लेखाच नाव वाचताना बेडुकतोंड्या ऐवजी बेडुकतोड्या वाचलं.. म्हटलं हे कोणत नवीन प्रकरण?! Lol

या पक्षाच नाव पहिल्यांदा ऐकल/वाचल. बेडुकतोंड्या बद्दल आणखी जाणुन घ्यायला आवडेल. फोटो असेल प्लीज डकवा..