सोडले आहे...

Submitted by मनोजकुमार देशमुख on 2 May, 2020 - 09:35

लिहिणे कविता त्याने सोडले आहे
आत्ताच लेखणीला मोडले आहे

लिहायचा पानभर अक्षरे अक्षरे
दौतेला शाईच्या फोडले आहे

विसरला गणगोत हे छंद मात्रांचे
त्या जिवलग शब्दांना खोडले आहे

चुकीचेच होते अंदाज नात्यांचे
ग्रीष्मात पावसाने झोडले आहे

परक्यास हे कशाला दोष ते द्यावे
आपल्याच लोकांनी तोडले आहे

झटकून टाक आता मनोज उदासी
नाते थेट तयाशी जोडले आहे

Group content visibility: 
Use group defaults

मात्रा (चार ओळी तपासल्या), काफ़िये व रदिफ नीट सांभाळली गेली आहे, लय मात्र हरवली आहे.

शाहीचे शाई केले तर बरे! भरीची अक्षरे टाळता आली तर उत्तम! अर्थ संप्रेषित व्हावा.

शुभेच्छा