मारून देखील दुनिया सारी

Submitted by आगबबूला on 1 May, 2020 - 14:09

मारून देखील दुनिया सारी कोरोना येथे रडला होता
गो करुणा गो बोलून आठवले त्याला नडला होता

मारून देखील दुनिया सारी कोरोना येथे रडला होता
थाळ्या टाळ्या वाजवायला सांगून मोदी त्याला नडला होता

मारून देखील दुनिया सारी कोरोना येथे रडला होता
पोलिसांचा मार खाऊन सामान्य नागरिक त्याला नडला होता.

मारून देखील दुनिया सारी कोरोना येथे रडला होता
रोज रोज नवीन पदार्थ बनवून मायबोलीकर त्याला नडला होता

मारून देखील दुनिया सारी कोरोना येथे रडला होता
लॉकडाउन 3.0 लागू करून उद्धव त्याला नडला होता

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults