ती वेळ चुकीची होती

Submitted by मनोजकुमार देशमुख on 1 May, 2020 - 09:25

तू असे पाहिले जाताना आस हकेची होती
निशब्द न बोललो काही ती वेळ चुकीची होती

हातात घेतले हात ओठांची भेट ती बाकी
माघार तिने का घ्यावी ती वेळ चुकीची होती

यंदाही चुकला त्याचा तो अंदाज पावसाचा
करपून पीक ते गेले ती वेळ चुकीची होती

का वांझ जमीन जहाली गळफास लावला त्याने
मिळाला विमा सरकारी ती वेळ चुकीची होती

सरणात प्रेत ते माझे कोणीच भोवती नाही
का मेघ असे बरसावे ती वेळ चुकीची होती

Group content visibility: 
Use group defaults

छान

वाह - अप्रतिम
खरे तर आपली जन्माला वेळ चुकीची होती