कळतच नाही़ काही

Submitted by मनसखी on 30 April, 2020 - 05:28

कळतच नाही काही
काय चाललयं....
मनात कुठेतरी
खुप काही साचलयं....

बोलायचय खुप काही
पण शब्द सोबत नाही....
सांगायचय खुप काही
पण ऐकणारा चेहरा समोर नाही....

एकांताच्या सहवासातही
भावनांची गर्दी काही ओसरतचं नाही...
अबोलपणाची ही बोलकी सर
कोणाला जाणवतचं नाही....

घेऊन विचारांची पालवी ही
अस्वस्थता सहन होत नाही...
काय चाललयं माझं
मलाच काही कळत नाही

Group content visibility: 
Use group defaults