नजरेत जणू तलवार कधी

Submitted by निलेश वि. ना. शेलोटे on 29 April, 2020 - 14:23

नजरेत जणू तलवार कधी
मज घाव तसे भरदार कधी

सुचलेच सखे मग काव्य जरी
कळलेच नसे तुज सार कधी

नित का नयनी सलते रजनी
करती स्मरणे छळ फार कधी

विरहास खरा तव घाबरलो
मग सावरलो हळुवार कधी

अदमास जरा चुकतात अता
जमले न मला व्यवहार कधी

निलेश वि. ना. शेलोटे
वृत्त:- तोटक
( ललगा ललगा ललगा ललगा )

Group content visibility: 
Public - accessible to all site users