प्रितीच्या फुला

Submitted by राजेंद्र देवी on 27 April, 2020 - 11:11

प्रितीच्या फुला

नको मागूस आकाशीचा चंद्र
खूप उंचावर आहे ती बला
नको मागूस गुलाबाच्या फुला
खूप काटे आहेत त्याला

नको बोलाउस पैलतीरा
भितो त्या डळमळत्या पुला
कसा येऊ भरदुपारी
उन्हाचा चटका लागतो पावला

खरं तर न्यायचे आहे सिमला
थंड हवेच्या ठिकाणी तुला
काल भेळ खाल्ली दोघांनी
माझा खिसा रिकामा झाला

तुझ्या पैश्यावर चैन करावी
सांग शोभते का मला
सांग तुजसाठी काय करू
माझ्या प्रितीच्या फुला

राजेंद्र देवी

Group content visibility: 
Public - accessible to all site users