माहेर सोडून जाताना

Submitted by गोपीनाथ जगताप on 26 April, 2020 - 20:58

सोडून जात असताना माहेर छकुले
डोळ्यात नको आणूस पाणी ग

सोडून जात असताना माहेर छकुले
डोळ्यात नको आणूस पाणी ग

तुझ्या बोबड्या बोलाची
हृदयात घुमतात गाणी ग

सोडून जात असताना माहेर ठेव ध्यानात ग
घर दूर जात नाही शाळा दूर जात नाही ग

रक्ताची माणसेही दूर जात नाही ग
तुझ्या आठवणी दूर जात नाही ग

तुझे बालपण अजूनही डोळ्यासमोर छान वाटतं ग
तुझ्या आनंदा पुढे सारे काही लहान वाटतय ग

ती शाळा ती पुस्तके पिशवीचे दप्तर
त्यांनच दिल ना गं या जीवनाला उत्तर

असंच जपत जा ग वेडे जपलेलं संस्कारांचं अत्तर
तुझ्या आठवणी हृदयात राहतील ग निरंतर

किती कितीही लांब असलो ना ग वेडे
तुझ्यासाठी बाबा धावत येईल ग

पुन्हा तुला प्रेमानं जवळ घेईल ग
तुझ्या भेटीतच मला सारं काही मिळेल ग

मी म्हणायचो तू आहेस माझी छकुली
माझ्या साठी शेवटपर्यंत छकुलीच राहशील ग

विसरु नकोस बेटा चांगलं काही करायला ग
त्यातच तुझा बाबा भरून पावलं ग

माझी छकुली म्हणून अभिमानाने मिरवलं ग
अभिमानाने मिरवलं ग

_गोपीनाथ जगताप

Group content visibility: 
Use group defaults