सुवर्णमुद्रा

Submitted by Dhananjay Wayal on 23 April, 2020 - 02:06

सुवर्णमुद्रा....

मे महिना चालू होता .अवधूत आणि प्राजक्ता वहिनी दोघेही सुट्टीसाठी कोल्हापूरला आलेले होते .आम्ही सर्व मित्र देखील कुठे ना कुठेतरी फिरायला जावे असा बेत आखण्या बाबत व्हाट्सअप वर चर्चा करत होतो. सर्वजण बरेच दिवस झाले बाहेर फिरायला गेलेले नव्हते. प्राजक्ता वहिनी देखील अवधूतला दूर नाही निदान इथे आसपास तरी फिरायला जाऊ, असा हट्ट करू लागल्या. त्यामुळे अवधूत ने इथेच आसपास कुठेतरी फिरायला जाऊ अशी योजना केली. त्यानुसार तो वहिनींना आणि अद्वेय ला घेऊन पन्हाळ्याला फिरायला गेला. गडाच्या पायथ्याला गाडी लावून, तो पायी किल्ल्यावर गेला. नंतर गड पाहून पुन्हा खाली आला आणि गाडी चालू करु लागला, तेव्हा त्याला असे जाणवले की आपल्या सीटवर कसला तरी कागद आहे. त्याने तो कागद नीट उलगडून पाहिला असता, त्याला असे जाणवले की, त्यामध्ये पन्हाळा किल्ल्याचा आणि आसपासच्या जंगलाचा नकाशा होता . त्या नकाशामध्ये जवळच्या एका गावांमध्ये एका विशिष्ट शाईने लाल खून केलेली होती आणि नकाशा च्या खाली त्या जागी 1000 सुवर्णमुद्रा आहेत असे वाकड्यातिकड्या अक्षरांमध्ये नोंदवलेले होते.

अवधूतने तो कागद वहिनींना दाखवला. तेव्हा वहिनींनी अवधूतला तो कागद फेकून द्या आणि घरी चला असे सांगितले. परंतु अवधूतने त्या कागदाची घडी घालून खिशामध्ये ठेवला आणि कोल्हापूरला गेला .

रात्रभर अवधूत त्या नकाशावर आणि सुवर्ण मुद्रांवर विचार करू लागला .तो वारंवार ही गोष्ट मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न करत होता, परंतु ती गोष्ट तितक्याच प्रखरतेने त्याला पुन्हा पुन्हा सतावत होती .

दुसऱ्या दिवशी सकाळी अवधूतने आम्हा सर्व मित्रांशी संपर्क साधला आणि त्यांना तातडीने कोल्हापूरला निघण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे सर्वजण कोल्हापूरला आल्यानंतर अवधूतने सर्वांना तो नकाशा दाखवला. त्या कशावरून आमच्या मध्ये दोन गट पडले, काही जण म्हणत होते आपण तिथे जाऊन प्रत्यक्षात पाहणी करू, तर काही म्हणत होते विनाकारण या गोष्टींमध्ये वेळ घालवण्यापेक्षा आपण चार दिवस गोव्याला जाऊन येऊ.

बऱ्याच वेळ चर्चा झाल्यानंतर शेवटी तेथे जाण्याचा सर्वांनी एकमताने निर्णय घेतला .गोव्यात जी आपण मजा करणार आहे , तशीच मजा आपण येथे दिवसभर सुवर्णमुद्रांचा शोध घेऊन संध्याकाळी करू, या अटींवर सर्वानी तिथे जाण्याचे ठरवले. सर्वप्रथम सर्वांनी त्या नकाशाचा इंटरनेट द्वारे किंवा मिळेल त्या साधनाने अभ्यास चालू केला. मनोजने त्या सुवर्ण मुद्रांच्या चित्राचा व्यवस्थित अभ्यास केला, तेव्हा त्याला समजले की ही सुवर्णमुद्रा राजा कृष्णदेवराय यादव यांच्या काळातील साधारण दहाव्या शतकातील आहे. एका सुवर्ण मुद्रेने वजन साधारण दहा तोळे असेल, तर अशा हजार सुवर्णमुद्रांचा चे 10000 तोळे होईल होईल. म्हणजे आजच्या बाजार मूलयानुसार त्याची किंमत 30 ते 40 कोटी होईल . कुणाल ने त्या नकाशावरील अक्षरांचा अभ्यास केला. अक्षर फार वाकडेतिकडे असल्यामुळे , तो नकाशा पूर्णपणे जुना असून, शाईच्या कलमाने लिहिलेला आहे असा तर्क काढला. त्यामुळे तो नकाशा 100% खरा आहे असा अंदाज काढला. तसेच दिपकने त्या नकाशा मध्ये ज्या छोट्या छोट्या खाचा दाखवलेल्या आहेत , त्या खांचा चा चा अर्थ म्हणजे छोटे छोटे खड्डे आहेत .त्यानुसार त्या सुवर्णमुद्रा कोठेतरी एक ते दोन फूट खड्डे मध्येच पुरलेल्या आहेत असा अंदाज बांधला.

बराच अभ्यास केल्यानंतर सर्वजण त्या नकाशा मध्ये दर्शीवल्याप्रमाणे गडाच्या पायथ्या जवळच्या गावामध्ये गेलो. सर्वप्रथम सर्वजण राहण्याची जागा शोधू लागलो. तेव्हा तिथे एक छोटा चौथीमध्ये शिकणारा शाळकरी मुलगा आला. गणेश ने त्या मुलाला येथे आसपास राहण्याची सोय आहे का ? याबद्दल का याबद्दल विचारले .यावर तो मुलगा म्हणाला या छोट्याशा गावात तुम्हाला राहण्यास हॉटेल वगैरे भेटणार नाही .परंतु तुम्ही माझ्या घराच्या बाजूला आमचीच छोटीशी झोपडी आहे तेथे तुमची राहायची आणि जेवणाची सोय होऊ शकते .त्यासाठी प्रति दिवस तुम्हाला 1000 रुपये द्यावे लागतील आणि जेवणाचे पैसे वेगळे द्यावे लागतील. त्या मुलाला आम्ही पटकन हो म्हणून टाकले आणि त्या ठिकाणी राहण्यास गेलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आम्ही त्या मुला कडूनच कुदळ आणि खोरे घेऊन त्या नकाशा मध्ये दाखवलेल्या ठिकाणी खड्डे खोदायला सुरुवात केली. दिवसभर वीस खड्डे खोदून झाले .त्यामुळे सर्वांना प्रचंड भूक लागलेली होती. इतकी प्रचंड भूक आयुष्यामध्ये आमच्यापैकी कोणीही अनुभवलेली नव्हती. संध्याकाळी आम्ही पुन्हा गावामध्ये त्या मुलाच्या घरी आलो .त्या मुलाला रोहित ने मस्तपैकी कोंबडी कापून चुलीवरचे चिकन करायला लावले. प्रचंड भूक लागल्यामुळे सर्वांनी पोटभरून जेवण केले आणि दिवसभर काम केल्यामुळे प्रचंड थकवा आलेला होता. इतके शारीरिक श्रम यापूर्वी कोणीच घेतलेले नव्हते . त्यामुळे झोप कशी आणि कधी लागली हे काही समजलेच नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पुन्हा खड्डे खोदायला गेलो, तेव्हा असे दिसले की शेवटच्या, म्हणजे विसाव्या खड्ड्यामध्ये थोडेसे आणखी खोदल्यानंतर एक कागद सापडला. त्या कागदावर एक बाण काढलेला होता . त्या बाणाचा अर्थ सर्वांनी त्या बाणाच्या दिशेने आणखी खड्डे खोदावे लागतील असा अर्थ काढला. मग त्यादिवशी आणखी वीस खड्डे खोदून थकून पुन्हा गावा मध्ये गेलो आणि पुन्हा भरपूर जेऊन गाढ झोपी गेलो. तिसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही पुन्हा खड्डे खोदायला गेलो , तेव्हा आम्हाला तोच प्रकार दिसला. म्हणजे चाळीसाव्या खड्ड्यामध्ये आणखी एक बाणाचे चिन्ह असलेला कागद सापडला.असेच मग पून्हा आम्ही तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी आणखी वीस खड्डे खोदले. एकूण ऐंशी खड्डे खोदून झाले होते. परंतु सुवर्णमुद्रांचा काही ठावठिकाणा लागत नव्हता. मग सचिनला आणि कुणाल ला घडत असलेल्या कृत्याबाबत शंका आली व संध्याकाळी झोपण्यापूर्वी सर्वजण चर्चा करू लागले की आपली कुणीतरी चेष्टा करत नसेल ना ? म्हणजे कोणीतरी मुद्दाम तो कागद खड्ड्यात पुरत नसेल ना? म्हणून सर्वांनी संध्याकाळी त्याठिकाणी पाळत ठेवण्याचे ठरवले.

त्यादिवशी रात्री झोपण्या ऐवजी गुपचूप आम्ही सर्वजण त्या खड्ड्यापासून साधारण 50 मीटर अंतरावर लपून बसलो. रात्री बारा वाजता कुणीतरी बॅटरी घेऊन त्या खड्ड्यात काहीतरी पुरत असल्याचे दिसले. तोच दीपक जोरात पळत गेला आणि त्या व्यक्तीला पकडले. त्याला पाहून सर्वांना धक्काच बसला, कारण आम्ही ज्या झोपडीत राहत होतो ,त्या घरातील तोच छोटा मुलगा होता . आता सर्वांना त्याचा प्रचंड राग आलेला होता. म्हणून त्याला सर्वांनी धमकावून या कृत्याबाबत जाब विचारला.

त्यानंतर त्या मुलाने बोलायला सुरु केले .माझे आई बाबा हे दररोज मोलमजुरी करून करून कुटुंब चालवता. आम्हाला शेती नाही किंवा दुसरे कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही. त्यामध्येच माझे बाबा आजारी पडले आणि त्यांना कोल्हापूर मधील मधील इस्पितळांमध्ये भरती केलेले आहे. त्यामुळे आईदेखील कामावर जाऊ शकत नाही आणि मी अल्पवयीन असल्यामुळे मला कोणीही काम देत नाही. मी आता चौथी मधून पाचवी मध्ये जाणार आहे . गेल्या महिन्यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेने शाळे मार्फत सर्वाना कळविले की, जो मुलगा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये 100 झाडे लावेल, त्याला कोल्हापूर जिल्हा परिषदेतर्फे दहावीपर्यंत शिक्षण मोफत, शिवाय दर महिन्याला पाच किलो तांदूळ भेटणार होते. त्यामुळे कसेही करून 100 झाडे लावण्याचा चंग मी बांधला. परंतु माझी शारीरिक ताकत जास्त नसल्यामुळे मी एवढे खड्डे एकटा खोदु शकणार नव्हतो. शिवाय बरोबर माझ्या मदतीला ही कोनीही नव्हते आणि त्यात घरातील अचानक उदभवलेले बाबांचे आजारपण.

मग मी ,या अवधूत काकांना पन्हाळ्यावर फिरायला आलेले पाहिले. ते किल्ल्यावर गेल्यानंतर ,मी माझ्या चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातील पन्हाळा किल्ल्याचा आणि भूगोलाच्या पुस्तकातील कोल्हापूर जिल्ह्याचा नकाशा फाडला. दोन्ही नकाशे एकत्र करून ,ते जुन्या काळातील वाटावे म्हणून पक्षाचे पंख आणि शाईचा वापर करून वापर करून मला जमेल तशा गोष्टी त्यावर लिहिल्या. पन्हाळ्यापासून माझे गाव 10 किलोमीटरवर आहे. माझ्या गावच्या आसपास पर्यटन क्षेत्राचा विकास न झाल्यामुळे एकही हॉटेल नाही. त्यामुळे राहण्यासाठी तुम्ही आमच्या गावात येणार हे नक्की मला माहीत होते. तुमच्याकडून राहण्यासाठी भाडे आकारून, माझ्या वडिलांच्या इलाजासाठी थोडेसे पैसे भेटतील असा माझा प्रयत्न होता.माझी चूक झाली काका मला माफ करा.

त्या मुलाचे बोलणे ऐकल्यानंतर सर्वांना त्याची फार दया आली. त्याने निवडलेला मार्ग जरी चुकीचा असला तरी त्यामागील त्याचा हेतु मात्र स्वच्छ होता. आपण कोणत्या परिस्थितीत राहत आहोत आणि या लोकांच्या जीवनात किती अठराविश्व दारिद्र्य आहे, याचा विचार केल्यानंतर सर्वांना फार दुःख वाटले.

दुसऱ्या दिवशी आम्ही राहिलेले वीस खड्डे खड्डे त्या मुलाला खोदून दिले .रोहितचे नुकतेच लग्न झालेले होते.रोहित ने त्याच्या लग्नामध्ये वाटण्यासाठी बरीचशी छोटी छोटी रोपे आणलेली होती. परंतु त्यातील भरपूर रोपे शिल्लक राहिलेली होती .मग रोहित ने घरून त्याच दिवशी त्यातील 100 रोपे मागवली आणि आम्ही तेथे त्या शंभर रोपांचे वृक्षारोपण केले. तसेच त्याच्या वडिलांच्या उपचारासाठी आणखी दहा हजार रुपये हवे होते, मग आम्ही सर्वांनी मिळून त्याच्या वडिलांच्या उपचाराचा खर्च केला आणि शिवाय जाताना त्या मुलाला खर्चासाठी काही आणखी पैसे दिले. मनोजने त्या गावच्या निसर्गसौंदर्याचा आणि आसपासच्या पर्यटन क्षेत्राचा सुंदर व्हिडिओ तयार करून तो युट्युब चैनल वर टाकला आणि आपण दिवसभर कष्ट करून झोपडीमध्ये राहण्याचा आनंद ,तसेच शहरी धावपळ व बैठी कामे सोडून खरे जीवन जगण्याचा आनंद या गावामध्ये कशाप्रकारे घेऊ शकतो, हे त्या व्हिडीओ चा वापर करून अगदी अप्रतिम पणे सांगितले. त्यानंतर त्या मुलाचा निरोप घेऊन , आम्ही तिथून निघून गेलो.

आज तीन वर्षानंतर आम्ही त्या गावांमध्ये पुन्हा गेलो होतो. ते गाव आता आता वेगळे पर्यटन क्षेत्र म्हणून उदयास आलेले होते. शहरातील बरेचसे पर्यटक येऊन गावाच्या आसपासच्या मोकळ्या जागेमध्ये खड्डे करून वृक्षारोपण करून, गावातील लोकांच्या छोट्या छोट्या घरांमध्ये राहून , खेड्यातील जीवनाचा आनंद घेऊ लागले होते. त्यामुळे गावाच्या आसपासच्या जंगल क्षेत्रांमध्ये भरपूर वाढ झालेली होती. शिवाय गावातील बरेच गरीब कुटुंबाला उत्पन्नाचे साधन मिळाले होते. गावामध्ये पोहोचताच तो मुलगा आम्हाला पुन्हा दिसला. त्याच्या अंगामध्ये आता चांगले कपडे होते .शिवाय आता त्याने पक्के घर बांधले होते .तो मुलगा जेव्हा आमच्यापाशी आला, तेव्हा त्याला आता फार गहिवरून आले होते व त्याच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आले. तो आम्हाला घेऊन थेट गावच्या सरपंचाकडे गेला व हेच आपल्या गावची कायापालट करणारे लोक आहेत . त्या गावातून आम्हाला लगेच जायचे होते, परंतु गावच्या सरपंचांनी आम्हाला जाऊ दिले नाही. संध्याकाळी दवंडी पेटऊन अख्या गावाला त्यांनी त्यांनी ग्रामपंचायती पाशी बोलवले आणि आमचा सर्वांसमोर नारळ देऊन जाहीर सत्कार केला...

समाप्त.

(संपूर्ण कथा ही काल्पनिक आहे)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults