तुमची आवडते मॉकटेल कोणते आहे ?

Submitted by कटप्पा on 22 April, 2020 - 23:05

हा धागा मी उघडेन असे कधी वाटले नव्हते. मी टिटोटलर झालो आणि बरेच दिवस काहीच घेतले नाही .
अजूनही दारू घेणार नाही यावर ठाम आहे. लॉकडाउन मध्ये घरी तुम्ही कोणकोणती मॉकटेल्स बनवताय यावर चर्चा करायला हा धागा.

मॉकटेल म्हणजे कॉकटेल नव्हे, त्यामुळे फक्त नॉन अल्कोहोलिक मॉकटेल्स बद्धल शेयर करूया |

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नॉन अल्कोहॉलिक मॉकटेल? अहो मॉकटेल नॉन अल्कोहॉलिकच असते... तुम्हाला नॉन अल्कोहॉलिक कॉकटेल म्हणायचे आहे का?????

ऐंशी नव्वद च्या दशकांमध्ये हैद्राबादेत राजीव रेड्डी प्रस्तुत कंट्री क्लब म्हणून एक क्लब होता. पैसे घेउन मेंबर शिप देत. मी ह्यांच्यासाठी जाहिराती लिहीत असे. व काम झाले की तिथेच खात पीत असे. अनेक वेळा इथे हॉल मध्ये प्रेस कॉन्फरन्सेस होत. जाणे होई. तर इथे फ्रूट पंच म्हणून एक मॉकटेल मिळे. मिक्स फ्रूट ज्युसेस चे बारके ग्लासेस व वरुन बारिक कापलेले अ‍ॅपल पायनापल चे तुकडे गारीगार. ज्युसेस वर थोडासा फेस. हा नेहमी ओठाला लागुन मिशी येइ. माझे तेव्हा स्कुटर वर फिरणे, उन्हातान्हात अशी लाइफ स्टाइल होती. त्यामु ळे त्या एसी हॉल मध्ये बसुन हे फ्रुट पंच मॉकटेल प्यायला जाम मजा येत असे. मी एका वेळी तीन ग्लास पण पीत असे थोड्या थोड्या वेळा ने. इतके आवडायचे. पुढे आम्ही ह्या क्लबची मेंबरशिप पण घेतली

खरे तर ब्लडी मेरी व मार्टिनी आव ड तात पण त्यांची नॉन अल्को होलिक व्हर्जनस व्हर्जिन मेरी व मार्टिनी पण चालसे.

मोहितो पण नॉन अल्को होलिक आव्डते.

नथिन्ग बीट्स गारीगार लिंबू सोडा. हैद्राबाद, मद्रास विजय वाड्याच्या उन्हाळ्यात.

मदुराईला मंदिरा समोर बाजार पेठ आहे तिथे जिगर थंडा म्हणून एक मिल्क बेस्ड ड्रिं क मिळते ते ही बेस्ट.

वर्जिन पिनाकोलाडा
व्हर्जिन मोहितो
ग्रीन अ‍ॅपल् सोडा
रास्प्बेरी सोडा
एका कुठल्याश्या लग्नात ड्रिंक म्हणून मिळालेल - लिम्का + ग्लासच्या तळाला पेरूचं सिरप. दिसायला मस्त होतं आणि चवीचं कॉबिनेशन ही आवडलं.
असंच ट्राय केलेलं खस सिरप + ताजा अननसाचा रस (हे मिक्स नाही करायचे, सिरप जस्ट ग्लासच्या तळाला हवं)
ब्लू कुरसाँ लेमोनेड
कोक्/फँटा फ्लोट्स (हे मॉकटेल्स नाहीत तरी)

इथून पुढले मॉक्टेल्स म्हणून नाहीत पण तरी ही फार आवडते आहेत -
जलजिरा सोडा
निंबू सोडा / फ्रेश लाईम सोडा
मसाला ताक (यात जर भूना जिरा पावडर वाला उत्तर भारतीय मसाला असेल तर बहार)
ताजा संत्र्यांचा/ मोसंबीचा/ कलिंगडाचा रस
फ्रोजन बेरी, आंबा स्मूदीज/सॉरबे
तयार थंडाई गारीगार दुधात

मॉकटेल नक्की कश्याला म्हणायचे कळत नाही. फळे आणि फळांचा रस अगदी दूधाईतकाच नावडता.
पण ताक, लस्सी, कोकमसरबत, लिंबूपाणी, नारळाचे/शहाळ्याचे पाणी, आवळा सरबत, जलजीरा, सोडा वगैरे जे आवडीचे प्रकार आहेत त्यात बरेच विविध प्रकारे एकमेकांशी टक्कर करून चवीनुसार मीठ, साखर, चाट मसाला, पादरं मीठ वगैरे टाकून प्रयोग चालू असतात.
बरेचदा कोरया चहावर वा लेमन टी वर सुद्धा प्रयोग करतो.
अट फक्त एकच. जे बनेल त्याची चव गोड नसावी. ते डोक्यात जाते.