दिशा मिळाली तू आल्याने

Submitted by निशिकांत on 19 April, 2020 - 23:22

वसंत फुलला मनी, सखीच्या सहवासाने
दरवळासही दिशा मिळाली तू आल्याने

गुदमरलेला श्वास मोकळा जरा जाहला
आज अचानक आठवलेल्या बालपणाने

शेवटच्या वळणावरही मन वळून बघते
दिसते का कोणी अपुले हे, प्राणपणाने

जरी मंदिरे कैक बांधली बालाजीची
नाव स्वतःचे दिले मंदिरांना बिर्लाने

धोका असतो जास्त जरी डॉक्टर लोकांना
इलाज करती कोरोनाचा खुल्या मनाने

गर्भगळित का देव जाहले कोरोनाने
बंद मंदिरी! काय करावे भक्तजनाने

कर्ता तू अन् तूच करविता, धाडलास का?
कोरोना हे सांगशील का विस्ताराने

चुटकीसरशी प्रश्न सोडवू आम्ही अमुचे
ईश कृपेची भीक न घेता, सहकार्याने

ऊठ जरा "निशिकांत" पुरे कर गरळ ओकणे
उठेल वादळ, वैचारिक या विध्वंसाने

आजच्या वातावरणामुळे कांही शेर कोरोनावर येणे अपरिहार्य आहे.

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users