धृतराष्ट्र संजयला विचारतोय

Submitted by मंगलाताई on 18 April, 2020 - 03:37

धृतराष्ट्र संजयला विचारतोय
हं सांग संजय पुढे काय

पुढे काही नाही महाराज
लोकांनी घरातच कोंडून घेतलयं स्वताला
रेल्वे बंद, विमान बंद
जालपोल, लुटमार, बलात्कार
मुंजी, लग्न, मर्तक सारे बंद
अरे मग माणूस काय करतोय ?
काही नाही महाराज
तो स्वताला वाचवतोय
इतर माणसांपासून .
हो म्हणजे थेट तसच ना
जसे आम्ही लढलो
युद्धात.
आपल्याच माणसांशी आणि वाचवू शकलो नाही आपल्याच माणसांना आपल्याच माणसांपासून.

पण अर्जुन काय म्हणतोय ?
लढणार आहे का तो यावेळी
तो म्हणतोय मी नक्की लढणार यावेळी
शस्त्र उचलणार
कारण मला वाचवायचाय
माझा जीव .

आणि कृष्ण
हो
कृष्ण ,समजवतोय अर्जुनाला
की, तू एकटा वाचून काही उपयोग नाही
वाचवायचे असेल तर
कौरवांसकट सगल्यांना वाचव
तू जिंकलास हे पहायला
हवे ना रे कुणीतरी.

Group content visibility: 
Use group defaults