Fiber ब्रॉडबँड इंटरनेट

Submitted by राज1 on 18 April, 2020 - 03:33

घरच्या उपयोगा साठी कोणते Fiber ब्रॉडबँड इंटरनेट वापरावे

Group content visibility: 
Use group defaults

ते तुमच्या लोकलिटी मध्ये कुठले ISP आहेत व त्यातले किती तुमच्यापर्यंत फायबर कनेक्टिव्हिटी पोहोचवू शकतात यावर अवलंबून आहे. ती माहिती असल्याशिवाय तुमच्या प्रश्नाचे उत्तर इथे कोणी देऊ शकेल असे वाटत नाही.

शशान्क, प्रतिसादा बद्दल धन्यवाद
आमच्या एरिया मध्ये माझ्या एका मित्राकडे BSNL ब्रॉडबँड कनेक्शन आहे, पण ते बऱ्याचदा बंद असते. बाकी कोणते INTERNET SERVICE PROVIDER असतील तर ते माहित नाही.
आमच्या एरिया मध्ये कोणते INTERNET SERVICE PROVIDER असतील ते कसे समजेल?
कोणत्या कंपनीचा Fiber ब्रॉडबँड इंटरनेट प्लान चांगला आहे ते सांगता येणार नाही का?

तुम्ही तुमच्या आसपासच्या भागात (टेलिफोन बॉक्स, पॉवर बॉक्स) कुठे ISP च्या जाहिराती आहेत का ते पहा. त्याशिवाय "BroadBand near me" सर्च गूगल मॅप वर करून पहा. तुमच्या भागातील ISP ची लिस्ट येईल. मग त्यांच्याकडे ते फायबर connectivity देतात काय याची चौकशी करून पाहा. तुमच्या आसपास त्यांचे कोणी ग्राहक असतील तर ते विचारून त्या ग्रहकांकडेही तुम्हाला चौकशी करता येईल.

वरील सर्च रिझल्ट मध्ये तुम्हाला लोकांनी त्या त्या broadband चे केलेले परिक्षणही सापडेल. त्यावरून तुम्ही निर्णय घेऊ शकता.

मोठ्या भूभागात फायबर सर्व्हिस देणाऱ्या कंपन्या कमी आहेत आणि त्यांच्याही कनेक्टिव्हिटी ला काही मर्यादा असतात. तसेच एकच ISP ने वेगवेगळ्या भागात दिलेल्या सेवेत खूप तफावत असू शकते. तरीही Hathway, एअरटेल व जियो तुमच्या भागात आहेत का ते पहा, कारण हे तीन सध्या आघाडीचे फायबर connectivity provider आहेत.

मला स्वतःला बी.एस.एन.एल.चा अनुभव चांगला आहे. त्यांनी हे काम outsource केलं आहे. त्यामुळं तुमच्या भागात कोण सेवा पुरवतो आणि लोकांना त्याचा अनुभव कसा आहे यावर तुम्ही ठरवू शकता.

तुम्ही पुण्यात कुठल्या भागात आहात? त्यावर फायबर कनेक्टिव्हिटी तुमच्या एरियात आहे की नाही हे ठरवता येइल. अर्थात फायबर हे आजकाल सोसायटीनुसार ही उपलब्ध करून देतात. तुमच्या सोसायटीमधून १५+ प्रॉस्पेक्टिव्ह कस्टमर्स असतील तर फायबर ले करून तुमची स्पेसिफिक सोसायटी फायबर इनेबल करता येऊ शकते.
आमच्या सोसायटी हे केलेलं आहे (८६ फ्लॅट्स). इथे फायबर कुणाचं नव्हतं पण आम्ही २०+ लोक्स असल्यानी टाटास्काय ब्रॉडबँड ला अप्रोच झालो आणि त्यांनी महिन्याभरात बहुतेक सगळ्या फ्लॅट्स मध्ये कनेक्शन्स ची उपल्ब्धता दिली. पुढे ज्यांना हवंय त्यांना चांगले प्लॅन्सही दिले. उदा. ७५०/- मध्ये ५०एमबीपीएस अन्लिमिटेड इ.

जिओ फायबरला संपर्क केला होता कारण ऑफिसच्या कामासाठी अचानक गरज पडली. आमची इमारत इनेबल केलेली नाही. मग मी लोकल केबल कडून इंटरनेट घेतलं तर आता तो जिओ वाला सारखा फोन करतोय, सेक्रेटरीची परवानगी घ्या, लोकडाऊन संपल्यावर करून देतो. लोकडाऊन संपल्यावर मला गरज नाही पण प्लॅन आकर्षक आहेत त्यांचे.