धीर काळजा नसेल काही

Submitted by निलेश वि. ना. शेलोटे on 17 April, 2020 - 14:31

धीर काळजा नसेल काही
बोल ऐकता सुरेल काही

हाय लाजने तुझे विषारी
तोल वाटतो ढळेल काही

डाव कोणता नवाच आता
हात लावता रुसेल काही

पाहिले तुला उगा नभाने
आज चांदणे जळेल काही

काय पाहतो निलेश डोळे
कैफ वेगळा चढेल काही

निलेश वि. ना. शेलोटे
वृत्त: मयूरसारिणी (गालगालगा लगालगागा )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह!
डाव कोणता नवाच आता
हात लावता रुसेल काही >>> >>> मस्तच.

@बेफिकीर जी
सध्या शिकतो आहे.
महत्वाचे म्हणजे, तुमच्याय लेखाचा आसरा घेऊन शिकतो आहे Happy
तुमच्या प्रतिसाद हा गुरूचा आशीर्वाद मिळाल्या सारखा आनंद झाला.