देखावा

Submitted by वेडोबा on 17 April, 2020 - 13:18

ती उठते
सकाळी कामांचा डोंगर उरकून ऑफिस ला जाते धावत पळत
हुश्श...पोचले एकदाची
कामांचा रगाडा उरकून परत घरी
मुलं अभ्यास स्वैपाक हे ते हे ते
मुखवटे लावून दिवस ढकलते
रात्री अंधार झाल्यावर ती स्वतःलाच विचारते
आता कोणता मुखवटा लावायचा..
मूळ चेहरा च विसरून गेले आहे..
हसरा मुखवटा लावून
वेळेमागे पळताना
जगायचं विसरून गेले आहे...
जगण्याचा देखावा करताना....

Group content visibility: 
Public - accessible to all site users