पुन्हा पुन्हा मग

Submitted by अरिष्टनेमि on 17 April, 2020 - 02:03

ऊर दाटूनि होतो हल्लक
हळू हळू मी पुन्हा कफल्लक
ही तुझ्या आठवांची श्रीमंती
पुन्हा पुन्हा मग तुझीच तल्लफ
पुन्हा पुन्हा मग तुझीच तल्लफ

पुन्हा आर्जवे, पुन्हा यातना
तुझ्या प्रीतीची पुन्हा याचना
अखंड गुलामी तुझ्या मिठीची
श्वासांची मग घुसळण अल्लद
पुन्हा पुन्हा मग तुझीच तल्लफ

देह धुनी अन् गात्रे जागी
ओढाळ मनाचा मी बैरागी
उत्तररात्री गाल छेडीते;…….
अवखळ बट तुझी, तिचीच गल्लत
पुन्हा पुन्हा मग तुझीच तल्लफ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान