पावसातले ते क्षण

Submitted by Kajal mayekar on 15 April, 2020 - 15:14

आज पाऊस येईल वाटते सकाळपासून मळभ आहे... अजय विचारात बस स्टँडवर येऊन पोहोचला. अरेच्चा हे काय आज इथे कोणीच कसे काय नाही... रस्त्यावर माणसांची वर्दळही फारच कमी आहे... अजय रस्त्यावर दूरवर नजर टाकत म्हणाला. जाऊदे ना आपल्याला काय उलट आरामात बसून घरी पोहचेन नाहीतर काय त्या बसमध्ये गर्दी असते... अजय विचारात होताच कि इतक्यात वारा जोरात वाहू लागला. वातावरणात बराच फरक अजयला जाणवला.

घरी पोहोचेपर्यंत पाऊस नको येऊदे रे देवा... अजयच्या मनात विचार चालूच होता इतक्यात त्याला समोरून एक मुलगी स्वतःची ओढणी सावरत येताना दिसली. ती मुलगी अजय थांबलेल्या बस स्टँड जवळच येत होती.

सायली..?? हो सायलीच..!! समोर सायलीला बघून अजयचे ह्रदय जोरात धडकू लागले. सायलीनेही अजयला ओळखले.

अरे अजय तु इथे..?? I mean... अजयला बघून सायलीला झालेला आनंद तिच्या चेहर्‍यावर स्पष्ट जाणवत होता.

सायली ही अजयची काॅलेज मैत्रीण. कॉलेजमध्ये सायलीला बघताच अजय तिच्या प्रेमात पडला होता. पण तिला विचारायचे त्याने कधी धाडस केले नाही. अजयला नेहमी भीती वाटायची की ती नाही म्हणाली तर..?? तिने आपली मैत्रीसुद्धा तोडली तर..?? प्रेम तर काही मिळणार नाही आपण मैत्रीही गमावून बसू ह्या भीतीने अजयने आपल्या प्रेमाची कबुली तिच्याजवळ दिली नाही.

काॅलेजनंतर आज अजयला सायली दिसत होती. कॉलेजमध्ये असताना ती जितकी सुंदर दिसत होती त्याहून अधिक सुंदर ती आता दिसत होती.

सायली बस स्टँडजवळ पोहोचली आणि पावसाला सुरुवात झाली. सायली पटकन अजयच्या बाजूला आली. पावसापासून वाचण्यासाठी म्हणून सायली अजय उभा असलेल्या शेडखाली आली त्यावेळी सायलीचा हलकासा स्पर्श अजयला झाला. तसे अजयच्या संपूर्ण शरीरावर रोमांच उठले.अजयने सायली कडे बघितले तर ती वैतागून समोर पावसाकडे बघत होती.
अजयला न आवडणारा तो पाऊस आता त्याला फारच आवडू लागला होता.

बस यायला अजून थोडा वेळ होता. अजय आणि सायलीच्या गप्पागोष्टी चालू होत्या. सायली सतत बोलत होती. बोलताना तिच्या नाजूक गुलाबी ओठांची होणारी हालचाल अजयला फारच मोहक वाटत होती. सायलीला इतक्या वर्षांनी समोर बघून तिच्याबद्दलच्या अजयच्या भावना पुन्हा जाग्या झाल्या.

अजयला गप्पांमधून कळले की सायलीने अजून लग्न केले नाही. अजयला हा देवाचा आशीर्वादच वाटला.

पावसाने आता चांगलाच वेग धरला होता. संपूर्ण रस्ता, मोठमोठी झाडे, नो पार्किंग मधल्या गाड्या सर्वकाही पावसाच्या पाण्याने न्हाऊन निघाले होते.

मगाशी मनाला शांत करणारा पाऊस आता अजयला थोडा उग्र वाटू लागला. सायलीही त्याला थोडी चिंतेत दिसली. आणि अचानक अजय आणि सायली उभे असलेल्या बस स्टँडवरचे शेड उडाले. ह्या अनपेक्षित घटनेने सायली इतकी दचकली की तिने अजयचा हात इतका घट्ट पकडला की तिची नखे अक्षरश अजयच्या हातात रुतत होती. अजयला वेदना तर होत होत्या पण त्या वेदनाही त्याला फार सुखदायक वाटत होत्या.
शेड उडाले आणि अजय व सायली काही सेकंदातच नखशिखांत भिजून गेले. ह्या सगळ्यातून दोघे सावरणार होतेच की इतक्यात समोरच्या झाडावर वीज कोसळली त्याचा इतका मोठा आवाज झाला की सायलीने अजयला घट्ट मिठी मारली.

सायलीने अजयला इतकी घट्ट मिठी मारली की तिच्या हातातल्या बांगड्या अजयच्या पाठी रुतत होत्या. अजयच्या संपूर्ण शरीरातून एक लहर गेली. अजय स्वतःचा हात सायलीच्या त्या नाजूक कमरेवर ठेवणारच होता की ती अजयपासून लांब झाली. अजयच्या मनात सायलीबद्दलच्या प्रेमाचे विचार चालू होते. आणि त्याच्याही नकळत त्याने आपल्या प्रेमाची कबुली सायलीसायलीजवळ दिली. जेव्हा अजय भानावर आला तेव्हा सायली त्याच्याकडेच बघत होती.

सायलीने मानेनेच आपला होकार दर्शविला.

पावसाने संपूर्ण ओलीचिंब झालेल्या सायलीला बघून अजयच्या भावना त्याला अनावर झाल्या.

अजयने सायलीच्या कमरेत हात टाकून तिला आपल्या जवळ ओढले. अजयच्या ह्या अनपेक्षित कृतीने सायली बावरली. तिने अजयच्या पकडीतून सुटायचा प्रयत्न केला. तिचा तो प्रयत्न बघून अजयने तिच्या कमरेभोवतीच्या आपल्या हाताची पकड अजून घट्ट केली. सायलीच्या लक्षात आले की अजयच्या जोरापुढे तिचे काही चालणार नाही तसा तिने तो प्रयत्न सोडून दिला.

सायलीची नजर खाली जमीनीवर होती. सायली अजयच्या इतक्या जवळ असल्याने लाजून चूर चूर झाली होती.सायलीच्या गुलाबी ओठांसोबत आता तिचा चेहराही लाजेने गुलाबी झाला होता.

अजयने सायलीच्या हनुवटीला पकडून तिचा चेहरा वर केला. तिच्या काळ्याभोर केसांतून पावसाचे पाणी ओघळत गळ्याकडे जात होते. पावसामुळे तिचा चेहरा पूर्ण ओला झाला होता. सायलीचे ओठ थरथरत होते. अजयने आपला चेहरा सायलीच्या चेहर्‍याच्या अगदी जवळ नेला.

अजयचा गरम श्वास सायलीला आपल्या चेहर्‍यावर जाणवू लागला तसे तिच्या ह्रदयाचे ठोके वाढले. तिने आपल्या हाताच्या मुठी घट्ट आवळून घेतल्या.
अजय आपले ओठ सायलीच्या नाजूक गुलाबी थरथरत्या ओल्या ओठांवर टेकवणार होताच की इतक्यात कसला तरी कर्कश आवाज होऊ लागला. क्षणाक्षणाला तो आवाज तीव्र होऊ लागला आणि अजयची झोप मोड झाली. अलार्म कर्कश्शपणे वाजतच होता. वैतागून अजयने अलार्म बंद केला व पुन्हा झोपी गेला.

समाप्त

Group content visibility: 
Use group defaults

छान कथा!!

की इतक्यात कसला तरी कर्कश आवाज होऊ लागला. क्षणाक्षणाला तो आवाज तीव्र होऊ लागला आणि अजयची झोप मोड झाली. अलार्म कर्कश्शपणे वाजतच होता. वैतागून अजयने अलार्म बंद केला व पुन्हा झोपी गेला.
>>>
हे कशाला उगाच. बिचारा अजय Lol

छान!! चांगली चाललीय कथा..मला तर जरा जास्तच इंटरेस्ट येऊ लागलाय...कारण माझ्या पहिल्या क्रशच नावंसुद्धा सायलीच होतं.. तिला मी ओळखायचो पण "ती" मला अजुनही ओळखत नाही...आता कुठे असते? काय करते? काहीच आयडीया नाही..

Thanks ajay
Tumchya pahilya crush ch nav hi sayli ani kathetlya naykache ani tumche hi nav same.. coincidence ajun ky

छान आहे कथा.
<<वैतागून अजयने अलार्म बंद केला व पुन्हा झोपी गेला.>>
पण इतकं मस्त स्वप्न पाहिल्यावर अजयला झोप लागलीच कशी?