आई वडिलांची काळजी

Submitted by Kajal mayekar on 12 April, 2020 - 14:33

आई वडिलांना आपल्या मुलांची नेहमीच काळजी असते पण बर्‍याचदा मुलांच्या काळजीपोटी ते कितपत स्ट्रिक्ट होतात हे त्यांच्याही लक्षात येत नाही.
आई वडिलांना आपल्या मुलांची काळजी असणे बरोबर आहे पण त्यांच्या त्या काळजीमुळे मुलांचा श्वास कोंडतो हे त्यांच्या का लक्षात येत नाही.
पालकांनी मुलांच्या पायात आपल्या प्रेमाची बेडी घालू नये जेणेकरून मुल आपले निर्णय स्वतः घेऊही शकत नाही.
आई वडिलांनी आपले निर्णय मुलांवर कधीच थोपवू नये अशाने मुल आपल्याच आई वडिलांपासून दूर होतात आणि दुनिया ह्याच प्रतिक्षेत असते हे पालकांना कधी कळणार.?
मुलांना त्यांचे निर्णय घेऊ द्यायचे. त्यांनी घेतलेल्या निर्णयांचे परिणाम त्यांना कळले पाहिजे.
कारण माणूस उपदेशाच्या बोलातून जेवढा शिकत नाही तेवढा तो अनुभवातून शिकतो.
आई वडिलांच्या अती काळजी घेण्याने मुलांना त्यांच स्वतःच आयुष्य जगता येत नाही.
पालकांना कळले पाहिजे त्यांच्या मुलांना त्यांच स्वतःच व्यक्तिगत आयुष्य आहे.
जेव्हा मुले पालकांपासून दूर जायला लागतात तेव्हा बाहेरची लोक त्यांना आपसूकच जवळची वाटतात.
आई वडिलांनी मुलांना स्वतंत्र जगू द्यायला हवे. मुलांवर अती बंधने मुलांना पालकांपासून दूर करतात.
बंधने असावीत पण प्रमाणात. कोणतीही गोष्ट प्रमाणाबाहेर विषासारखीच काम करते मग भलेही ते आई वडिलांची काळजीही का असेना..

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

पटलं Happy