अस्वस्थ पामर

Submitted by मुक्ता.... on 10 April, 2020 - 04:00

रिपोस्ट.....
पण आताच्या परिस्थतीला कदाचित चपखल बसेल हे काव्य...

भेगाळल्या भुईला
अंधाराचा भार
उभी जखम डोईला
कातरल्या दिशा चार

देह जर्जर जाहला
जगणे हे लाचार
उभा जन्म हा पाहिला
आभासाचा स्वैराचार

रावाच्या महाला
पाही रंक बेजार
विषमतेचा बोलबाला
अजब हा शेजार

निर्जीव दगडाला
का मानावे ईश्वर
अस्वस्थ पामराला
उत्तरी रे सत्वर

रोहिणी बेडेकर
१०/०४/२०१८

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Deep..