तेजोमय पहाट

Submitted by Brahmanand on 8 April, 2020 - 14:14

भासे जरी मनाला
तेजाचे तारे तुटले
अंधारलेल्या वाटा
प्रकाशाचे हात सुटले

अंधकार दिसतो जो हा
ग्रहणातला सूर्यास्त आहे
तळपेल तेजोनिधी नभात
अधिराज्य गाजवित पाहे

पाहिली कितीतरी आम्ही
आक्रमणे या भूवरती
दृश्य होत ती कधितर
अदृश्य वार करीती

परतवली परी निरंतर
निष्प्रभ तयांसी करुनी
फडकत राही विजयध्वज
मान ताठ उंच अभिमानी

गर्तेत निराशेच्या
झोकणे न मान्य आम्हा
दीप उजळती लाख
हटविण्यास येथल्या तमा

विपरीत काळ हा अल्पसा
धारिष्ट्य धरुनी साहे
कोटी सूर्याचा तदनंतर
प्रकाश दिसतो आहे

भविष्याचे असो त्या स्वागत
ये खचितच जे घेऊनी
भारत देशा आमुच्या
उत्तुंग यशशिखरा बसवुनी

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults