अभिवादन

Submitted by Asu on 7 April, 2020 - 11:38

आजच्या जागतिक आरोग्यदिनानिमित्त सर्व ज्ञात अज्ञात आरोग्य सेवकांना-

अभिवादन

संकर भयंकर रणी माजला
कोरोनाचे होता आक्रमण
वणव्यासम जगी पसरला
भेटेल त्यास करी संक्रमण

बेधुंद मातला जगी पसरला
रोज करतो सहस्त्र भक्षण
देवही आता लपून बसले
कवण करील आपुले रक्षण

शूर सैनिक लढती रणांगणी
डॉक्टर परिचारक फार्मसिस्ट
पोलीस प्रशासन आणि सेवक
रात्रंदिन अविरत करती कष्ट

फार्मसिस्टसम अनामवीरांची
वाटते खरोखरी मनात खंत
गौरविले जरी नाही कुणीही
काम सदैव जैसे करती संत

देव नव्हे पण म्हणू देवदूत
करू सर्वांचे आज अभिनंदन
कृतज्ञ भावे विनम्र होऊनि
आरोग्यदिनी करूया वंदन

-प्रा.अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
(दि.07.04.2020)
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults