किसने बचाया मेरी आत्मा को - आलोक धन्वा

Submitted by सामो on 4 April, 2020 - 11:54

या जगात नानाविध भव्यदिव्य अनुभव आहेत. कर्तुत्व गाजविण्याच्या संधी आहेत. महत्त्वाकांक्षा, वक्तृत्व, प्रसिद्धी, श्रीमंती, वैराग्य आदि डोळ्यांचे पारणे फेडणारे गुण आहेत. अनेक प्रकारची व्यक्तीमत्वे या ना त्या कारणाने सतत आपल्या सहवासात येत असतात. यातील अनेक जण ज्ञानाने, धनाने, सामर्थ्याने आपल्यापेक्षा थोर असतात. आपल्याला असूया, दबदबादेखील वाटू शकतो.
पण थोडा अंतर्मुख होऊन विचार केला तर आपल्या लक्षात येते की - आपल्या जीवनात वरील भव्य गोष्टी या अळवावरच्या पाण्यासारख्या येतात आणि जातात. खरच जर काही आपल्या अंतर्मनाला स्पर्शून, खोल परीणाम करून जात असेल तर त्या असतात लहान पण अर्थगर्भ, अर्थवाही कृती - मित्राचे पत्र, आईशी फोनवर बोलल्यानंतर "बाय" बोलताना , तिचा भरून आलेला आवाज, आपल्या बाळाचे बोबडे बोल, आपला मूड चीअर अप करण्यासाठी मैत्रिणीने अडखळत केलेले प्रयत्न . या सहजसुंदर क्षणांनी आयुष्याला अर्थ लाभलेला असतो, जगायला बळ मिळालेले असते, आत्मा तृप्त झालेला असतो.
आलोक धन्वा यांची खालील कविता असंच काहीसं भाष्य करताना आढळते -
कोणाला वेगळा अर्थ लावता आल्यास त्यांनी जरूर लिहावे . स्वागत आहे.

किसने बचाया मेरी आत्मा को

किसने बचाया मेरी आत्मा को
दो कौड़ी की मोमबत्तियों की रोशनी ने

दो-चार उबले हुए आलू ने बचाया

सूखे पत्तों की आग
और मिट्टी के बर्तनों ने बचाया
पुआल के बिस्तर ने और
पुआल के रंग के चाँद ने
नुक्कड़ नाटक के आवारा जैसे छोकरे
चिथड़े पहने
सच के गौरव जैसा कंठ-स्वर
कड़ा मुक़ाबला करते
मोड़-मोड़ पर
दंगाइयों को खदेड़ते
वीर बाँकें हिन्दुस्तानियों से सीखा रंगमंच
भीगे वस्त्र-सा विकल अभिनय

दादी के लिए रोटी पकाने का चिमटा लेकर
ईदगाह के मेले से लौट रहे नन्हे हामिद ने
और छह दिसम्बर के बाद
फ़रवरी आते-आते
जंगली बेर ने
इन सबने बचाया मेरी आत्मा को।

६ डिसेंबर म्हणजे या कवितेला राजनैतिक रंग असण्याचा दाट संभव आहे. कोणाला वेगळा अर्थ लावता आल्यास स्वागत आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

यात कवितांचा आणि कथांचा रेफ रंस आहे का? हमीद ची गोष्ट वाचली आहे..बाकीचे मिस झाले असतील मेबी...माझ्या आयुष्याला या सगळ्या लेखनाने बळ दिले आहे असा काहीतरी अर्थ आहे का?