द असेसियन पार्ट - २

Submitted by डार्क नाईट on 3 April, 2020 - 03:08

सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक असून या कथेचा कोणत्याही व्यक्तीशी,ठिकाणाशी,नावाशी सबंध केवळ योगायोग समजावा.
________________________________________________

वेळ :- सकाळी १०:०८
ठिकाण :- साऊथ बीच, सॅन फ्रान्सिस्को.
तारीख :- २० जुलै २०१५

डॅरेन आपल्या घरातील लिविंग रूम मध्ये टीव्ही वर गोल्डन स्टेट वॉरियर्स विरूद्ध शिकागो बुल्स यांच्यामधील NBA मॅच पाहत बसलेला असतो आणि तेवढ्यातच त्याचा स्मार्ट वॉच वर त्याचा घराबाहेर कोणीतरी उभे असल्याचे नोटिफिकेशन येते.तो वॉच मध्ये पाहतो तर त्याला दाराबाहेर पोस्टमन उभा असल्याचे दिसते. आणि तो जाऊन दार उघडतो.

पोस्टमन :- मिस्टर मॅकनाईट?

डॅरेन :- येस,मीच डॅरेन मॅकनाईट आहे.

पोस्टमन :- तुझा प्रायव्हेट एजंट कोड सांग.

डॅरेन :- ०७०७

पोस्टमन :- मी टेकनिकल एजंट १८०२, तुझ्या पुढील मिशन ची डिटेल्स या पाकिटात आहेत.(पोस्टमन आपल्या जवळील खाकी रंगाचे पाकीट डॅरेनच्या हातात देतो व तिथून निघून जातो.)

डॅरेन सर्वप्रथम दार लॉक करतो व टीव्ही बंद करून त्याच्या घराच्या बेसमेंटमधील हाइ्स्ट रूम मध्ये जातो व ते पाकीट उघडून त्यातील मिशन डिटेल्स वाचायला सुरवात करतो :-

प्रायव्हेट फील्ड एजंट '०७०७', C I A ला काही खास सुत्रांद्वारे कळले की १६ जुलै‌ २०२५ रोजी हॉटेल एस्पिंसन, येथे माकरोविच गॅंग आणि वेपन डिलर यांच्यादरम्यान 'हायड्रोजन बॉम्ब अॅक्टीव‌्हेटर फ्युज' ची डिल होणार होती आणि त्या डील ला थांवण्यासाठी आम्ही फील्ड एजंट २५७३ याला तेथे पाठवले होते.परंतु गॅंग मेंबर्सना त्यांच्यावर कोणीतरी पाळत ठेवून आहे हे लक्षात येताच त्यांनी एजंट २५७३ ला पकडले व बंदी बनवून आपल्या सोबत घेवून गेले.आम्ही ही घटना कशा प्रकारे घडली हे पाहण्याच्या इच्छेने घटना घडली त्या वेळचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता ते बदलण्यात आले आहे असे आम्हाला आढळले. तर एजंट तुमचे मिशन असे आहे की १)माकरोविच गॅंगचा हायड्रोजन बॉम्ब अॅक्टीव‌्हेटर फ्युज विकत घ्येण्यामागील उद्देश काय आहे हे जाणून घेणे आणि त्यांच्या पुढील विघातक कृतीला थांबविणे. २) फील्ड एजंट २५७३ ला त्यांच्या तावडीतून सुखरूप सोडविणे.मिशनसाठी लागणारी रक्कम आपल्या अकाउंट मध्ये ट्रान्स्फर करण्यात आली आहे.तुमच्या अथवा एजंटच्या जीवास कोणतीही हानी झाल्यास अथवा सार्वजनिक हानी झाल्यास C I A कोणतीही जवाबदारी स्वीकारणार नाही. गुड लक.
(हा संदेश पाकीट उघडल्यानंतर १५ मिनटात आपोआप गायब होईल.)

डॅरेन आपला लॅपटॉप ऑन करतो आणि डाटाबेस मध्ये माकरोविच गॅंग विषयी सर्च करतो तेव्हा त्याला कळते की माकरोविच गॅंग ही विस्फोटक बनवणारी गॅंग असून ती खास ऑर्डर नुसार कोणत्याही प्रकारचा बॉम्ब बनवून देते.तेवढ्यात त्याची नजर मिशन डिटेल्स असलेल्या कागदावर जाते आणि डॅरेन कागदाकडे पाहून एक स्मितहास्य करतो कारण कागदावर लिहलेले सर्व गायब झालेले असते.
_____________________________________________

वेळ :- दुपारी १२:४०
ठिकाण :- C I A headquarters,Langley,varginia.
तारीख :- १९ जुलै २०१५

सेक्रेटरी गूढ विचार करत तंद्रीत गेलेले असतात तेवढ्यात त्यांचा फोन वाजतो.सेक्रेटरी फोनची स्क्रीन पाहतात तर त्यांना रशियन नंबर दिसतो,आणि खाली डिटेल्स मध्ये दिसते की पब्लिक टेलिफोन बूथ(१३३ माॅस्को).ते कॉल रिसिव्ह करतात.

सेक्रेटरी :- हॅलो,कोण बोलत आहे? आणि अापणला हा नंबर कसा मिळाला?

अ‍ॅलेक्स अ‍ॅन्ड्रीव्ह :- झीद्रास्तवित्च्या, मिस्तर सेक्रेतरी.

सेक्रेटरी :- ( सेक्रेटरीना हा आवाज या आधी ऐकल्या सारखा वाटतो परंतु खात्री करण्यासाठी सेक्रेटरी पुन्हा विचारतात) कोण आहेस तू? आणि तुझ्याकडे हा नंबर कुठून आला?

अ‍ॅलेक्स अ‍ॅन्ड्रीव्ह :- माझा आवाज ओळखला नाही वाटते तुम्ही! मी अ‍ॅलेक्स अ‍ॅन्ड्रीव्ह बोलतोय सेक्रेटरी.मला तुमचा हा नंबर तुमच्या एजंट कडूनच मिळाला आहे.आणि मला कळले आहे की एजंट २५७३ तुमच्या डिपार्टमेंटमधील सर्वात वरिष्ठ एजंट असून तुमच्याही खूप जवळचा आहे.मी तुमच्या या एजंटला टॉर्चर करून C I A मधील सर्वात गुप्त फोन नंबर मिळवला आणि तुम्ही विचार करू शकता की मी आणखी किती गुप्त माहिती मिळवू शकतो.जर तुमची इच्छा नसेल की मी तुमच्या एजंट ला टॉर्चर करून C I A विषयी अधिक गुप्त माहिती मिळवावी आणि त्यानंतर याला मारून टाकावे तर लवकरात लवकर डॅरेन मॅकनाईट ला माझ्या कडे पोहचवण्याची व्यवस्था करा.

सेक्रेटरी :- कृपया करून एजंटला काही करू नकोस,मी डॅरेन मॅकनाईट ला तुझ्यापर्यंत पोहचवण्याचा प्लॅन तयार केला आहे,आणि प्लांनुसार माझे त्याच्याशी फोनवर बोलणे झाले आहे.

अ‍ॅलेक्स अ‍ॅन्ड्रीव्ह :- ठीक आहे सेक्रेटरी,डॅरेन मॅकनाईटला या विषयी काहीही कळता कामा नये याची खबरदारी घ्या नाहीतर पुढील परिणामास सर्वस्वी तुम्हीच जवाबदार असाल. मी अपेक्षा करतो की तुम्ही डॅरेन मॅकनाईटला माझ्यापर्यंत लवकरात लवकर पोहचवाल. दोस्विदानिया.
_____________________________________________

वेळ :- रात्री ११:२०
तारीख :- २३ जुलै २०१५
ठिकाण :- टरमिनल १,दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट,दुबई.

डॅरेन वेटींग लाउंज मध्ये आपल्या फ्लाईटची अनाउन्समेंट होण्याची वाट बघत बसलेला असतो आणि आपल्या 'सेक्युर नेटवर्क' फोन वर कोणाचातरी नंबर डायल करतो.

(पहाटेचे ४:२०, ओसाका,जपान.)

डॅरेन :- हॅकर६४

आकीहीरो :- डॅरेन,मित्रा ही काय वेळ आहे का फोन करण्याची घड्याळात बघ सकाळचे ४:२० वाजले आहेत. प्लीज आपण नंतर बोलू, मला आता पुन्हा झोपुदे मला माझे अर्धवट राहिलेले स्वप्नं पुन्हा पाहायचे आहे.(अाकी हीरो एक मोठी जांभई देतो.)

डॅरेन :- आळशी माणसा जरा नीट बघ मी फोन कोणत्या डी वाईसवर केला आहे ते आणि माझी फोन लोकेशन बघ.

आकीहीरो :- ( आपल्या 'सेक्युर नेटवर्क' फोनच्या स्क्रीनवर फोन लोकेशन पाहतो.)ओह सॉरी डॅरेन,पण तू दुबईत काय करतो आहेस?आणि मला फोन करायचे काही विशेष कारण?

डॅरेन :- ( डॅरेन मागील दिवसात घडलेल्या घटना आणि त्याचे दुबईत असण्याचे कारण आकीहीरोला थोडक्यात सांगतो ) आकीहीरो मी तुला माकरोविच गॅंग विषयी महती पाठवत आहे.मला ऐवढेच कळले आहे की ही गँग आपला सर्व कारभार युक्रेन मधून चालवते.तू याविषयी आणखी माहिती काढण्याचा प्रयत्न कर.

आकीहीरो :- ठीक आहे मी प्रयत्न करतो,आणि काही वेळात तुला माहिती पाठवतो.

डॅरेन :- मला माहिती पाठवण्याची गरज नाही,आता आपण प्रत्यक्ष जर्मनीत भेटू.तुला माहित आहे जर्मनीत कुठे यायचे आहे ते.बाय

आकीहीरो :- ठीक आहे,बाय.

आकीहीरो यामाडा,C I A मधील एक माजी टेकनिकल एजंट आणि मास्टर हॅकर , ज्याने काही खास कारणांमुळे रिटायरमेंट घेतली आणि आता ' द असासियन ' साठी काम करतो.

डॅरेन पुन्हा एकदा आपल्या 'सेक्युर नेटवर्क' फोनवर कोणाचा तरी नंबर डायल करतो.

( संध्याकाळचे ८:४०, लंडन इंग्लंड.)

डॅरेन :- अॅफ‌्रोडाइट ६४

नताशा :- हॅलो, माय डियर किती दिवसांनी फोन केलास माझी एकदा सुद्धा आठवण आली नाही.

डॅरेन :- आठवण तर तुझी मला रोज येते डार्लींग जेव्हा मागील मिशन मध्ये तू चुकून मझ्या नाकावर मारलेल्या ठोषामुळे त्याला ठणका बसतो!

नताशा :- तुला किती वेळा सॉरी म्हणायचं.बर ते सर्व ठीक आहे, पण मला फोन करण्याचे काही खास कारण?

डॅरेन :- (डॅरेन नाताशाला मागील दिवसात घडलेल्या घटना आणि आकीहीरोशी झल्येल्या बोलण्याचा वृत्तान्त थोडक्यात सांगतो.) उद्या आपण जर्मनीत भेटू, तुला माहित आहे कुठे यायचे आहे ते.बाय

नताशा :- ठीक आहे.बाय

नताशा इवानोव, एक माजी रशियन एजंट आणि एक घातक फायटर जिच्यावर शत्रू राष्ट्रांच्या एजंटशी सबंध असण्याचे आरोप ठेवून देशातून तडीपार करण्यात आले.जी आता गुप्तपणे लंडनमध्ये वास्तव्यास असून ' द असासियन ' साठी काम करते.

डॅरेन फोन ऑफ करतो आणि तेवढ्यातच त्याचा फ्लाइटची अनाउन्समेंट होते आणि तो गेट नंबर ९ कडे मार्गस्थ होतो.
_____________________________________________
क्रमशः

( ' द असासियन 'चे दुबई मध्ये असण्याचे कारण आणि हे तिघे जण जर्मनीत कुठे भेटणार आहेत आणि त्यांच्या पुढील प्लॅन काय असणार आहे हे पुढील भागात )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users