होय मी घरी आहे

Submitted by मंगलाताई on 29 March, 2020 - 02:03

मार्च 2020भारतात सर्वत्र संचारबंदी लागू.मनात कोविद-19 चे भय, स्वतःच्या व आप्तांच्या जीविताचे भय.अशात व्हाट्स अँप वर येणाऱ्या भरमसाठ व्हिडिओ, आँडिओ आणि पोस्ट यांची खैरात.दूरदर्शन समोरुन न हटता त्यातच आपल्या भविष्याचे गणित शोधत आपला वर्तमान काळ पूढे पूढे सरकत जातांना बघणे यात आम्ही जनसामान्य गुंतलो.प्रश्न एकच आता काय करावे.
पण अहो याआधी भारतावर संकट आली नव्हती का ? मग आमच्या पूर्वजांनी काय केले ?
खरे तर ही वेळ स्वतः ची परीक्षा स्वतः च देण्याची आहे . परीक्षेची तयारी आपल्यालाच करायची आहे ,परीक्षक तुम्हीच आणि उत्तीर्ण तुम्हीच होणार .घरातील मुलांसोबत आम्ही आता राहतोय तेव्हा त्यांना मायेचा स्पर्श , आश्वासक द्रुष्टी , एखाद्या विचारावर ठाम निष्ठा, सकारात्मक द्रुष्टीकोण या सगळ्यांचा अनुभव द्या . ह्या बाबी कोणत्याही संस्थेत शिकवल्या जात नाहीत , यासाठी कुटुंब संस्था च योग्य आहे .मुलांच्या परीक्षा रद्द झाल्या म्हणून त्यांच्या अभ्यासाला पूर्णविराम लागला असे समजू नका .पुस्तकं जरा बाजूला ठेवून अनुभवांचे अनुभव घेऊ द्या .हीच वेळ आहे प्रौढांचे घरी असण्याची योग्य वेळ .आपल्या पेक्षा लहानांच्या पाठीशी समर्थपणे ऊभे रहा, अनुभवांचे गाठोडे घेऊन . या गाठोड्यातून वर्षानुवर्षे अनुभव लेले विचार, अनुभव, अभ्यास बाहेर येऊ द्या .घरातल्या घरात मुलांना घरगुती आयुर्वेदिक औषधं,आजीबाईच्या बटव्यातील साहित्य यांची ओळख करून द्या . भारतीय सणावारांचे महत्त्व, संस्कारांचे महत्त्व विज्ञानाशी जोडून सांगण्याची योग्य वेळ आहे .आमच्या अंतरंगात डोकावून बघण्याची उत्तम संधी निसर्गाने आता दिली आहे .ऊर फाटेस्तोवर धावणारा मानव घरात बसला आहे .आमच्या धावण्याला निसर्ग लगाम घालतो आहे त्यापेक्षा स्वतः आम्ही आमच्या धावण्याची गती स्वतःच्या आटोक्यात ठेवून निर्भयपणे जगू शकतो हे सहकुटूंब अनूभवता येत आहे .
आमच्या आत डोकावण्यासाठी विश्रांती मिळावी म्हणून निसर्गाने लावलेल्या पूर्णविरामाचे आभार मानूयात .आमचं काय चाललयं याचं परिक्षण करूयात .मुलांच्या परीक्षा झालेल्या नाहीत मात्र आम्हा पालकांच्या परीक्षा सुरू झाले ल्या आहेत .या क्षणी हे सगळ्यांना समजू द्या,समजावून सांगा की,प्रत्येकाच्या आयुष्याची परीक्षा ही जीवनाच्या अंतापर्यंत सुरू रहातच असते .व्यावसायिक, शैक्षणिक अर्हता प्राप्त करून अर्थाजन केले, आता मला कोणाचेच काही देणे घेणे लागत नाही ही संकल्पनाच मूळी खोडून काढली या साथीने. हे ज्यामुळे लक्षात आले तोच सच्चा साथी समजूया .
मुलं मोठी झालीत त्यांच ते बघतील . आम्ही जबाबदारी तून मुक्त झालोय आणि ते स्वतंत्र झालेत हा भाव या क्षणी मारक ठरेल .घरातील थोरामोठ्यांना मुलांच्या पाठीशी राहून परीस्थिती ला काय उत्तर द्यावे याची जाणीव करून देणे अत्यावश्यक झाले आहे . घरातील वडिलधाऱ्यांनी अनेक पावसाळे पाहिले आहेत ,अशा वेळी घरात जे-जे सकारात्मक करता येईल ते करावे .मनात भय येऊ न देता योग्य चर्चा कराव्यात . कुटुंबाला सांगा की आपल्याला एकत्र रहायला वेळ मिळाला आहे आपण फायद्यात आहोत .दीवाळी-दसरा ,सणवार जसे एकत्रितपणे साजरे करतो तसेच आता आलोय पण चमचमीत पदार्थांवर ताव मारण्यासाठी नव्हे तर जुनी औषधं अभ्यासण्यासाठी, शरीरातील प्रतिकार शक्ती चा अभ्यास करण्यासाठी, मन संयमित ठेवण्यासाठी.
आमच्या आयुष्यात येणारे अनुभव आमच्या मनावर काही स्मृती जपून ठेवतात, आमच्या आताच्या विचार प्रक्रियेशी आधी चे अनुभव चर्चा करतात, आतल्याआत विचार मंथन सुरू असते.अशा संकट समयी निर्णायक विचार मुलांना द्यायची वेळ आहे. अनुभव च आम्हाला धीर देतात आणि अनुभव च पटकन दिशा सुचवतात . तेव्हा माझं वय झालं आता काय?असे हवालदिल न होता मनोबल वाढवा .मुलांना कळू द्या की जीजिविषा ही अत्यंत प्रभावी शक्ती आहे, पण आमच्या आसपासचे सर्व सजीव जगत असतील तरच आम्ही जगू .पसायदानाचा खरा अर्थ त्यांना आता सांगा.
प्रसार माध्यमांवर धडकणाऱ्या बातम्यांमुळे सजग रहा, सतर्क रहा हे तर योग्य च आहे,पण मनोबळ वाढवण्यासाठी आम्ही भारतीय प्रौढच यशस्वी ठरु शकतो .'दादी-नानी की भुक्कड कहानीया' इतरांनी हिणवले तरी आपल्या जगण्यातले दीर्घ व सम्रुद्ध अनुभव मूलांच्या पदरात घाला .कुटुंबाचे महत्त्व सांगण्याची सूवर्णसंधी सोडू नका ,कारण जो-तो कुटुंबातच परत आलाय .भीतीने दुकानातून भरमसाठ वस्तू साठवण्याऐवजी काही घरगुती उपाय सुचवा,अरे हे पण करून बघ असे आपल्या गाठीशी असलेले अनेक छोटे उपाय अंमलात आणा .
या समयी मुलं तुमचं ऐकतिलं एकदा दोस्ती करून तर बघा .नवे वैश्विक तंत्रज्ञान आणि प्राचीन भारतीय संस्कृती याचा योग्य मेळ घालण्याची हीच योग्य वेळ आहे .तेव्हा घरातील थोरांनी आपली भूमिका एका योग्य गुरूची आहे असे समजून योग्य निर्णय घ्यायला मुलांना शिकवा .
संकटसमयी योग्य निर्णय घेणे या परीक्षेसाठी सर्व तयार रहा .या गुणांचा फायदा भारतीयांना आपोआप मिळणार आहे.बघा या संकटातून बाहेर आल्यावर नक्की आपल्या शेजारच्यांचे,समाजासाठी राबणाऱ्यांचे,सेवाभावी हातांचे आभार माना .पैशापेक्षा सकारात्मक विजय यशस्वी ठरेल .पैशापेक्षा सेवा भाव जिंकेल, पैशापेक्षा धैर्य, निष्ठा आणि विश्वास हेच बळ देतील .
आणि हो हा अनूभव आमच्या शेजारच्यांनी दिलाय तेव्हा त्यांचेही आभार मानूयात .कारण कसेही असले तरी ते आमचे शेजारी च आहेत . त्यांनी तर आमचे डोळे उघडले आहेत .
मुलांनो मी घरी आहे, तुमच्यासाठी च मी घरी आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users