गुढी ऊभारु प्रेमाची

Submitted by वैशाली अ वर्तक on 28 March, 2020 - 12:27

**गुढी प्रेमाची**

आला सण पाडव्याचा
लावू गुढी समतेची
दूर सारु जाती भेद
गुढी उभारु प्रेमाची

विसरुनी राग द्वेष
मनी भरु प्रेम भाव
जसे होते रामराज्यी
नसे सुखाचा अभाव

स्वच्छ ठेवण्या भारत
करु निर्धार मनाचा
पळवून कोरोनाला
क्षण आणू आनंदाचा

बांधू तोरण आंब्याचे
दारी रेखुया रांगोळी
सौख्य नांदो घरोघरी
काढू शुभेच्छांच्या ओळी.

जग सुखी सारे होवो
हेच मागणे देवास
पूर्ण होवोत कामना
दूर कर कोरोनास

ध्येय ठेवू सदा उंच
मुखी ठेवूनी गोडवा
जपू संस्कार संस्कृती
आला सण हा पाडवा

.वैशाली वर्तक.....23/3/2020

8141427430

Group content visibility: 
Use group defaults