देणं भाग १
https://www.maayboli.com/node/73867
देणं भाग २ :-
दादर ची चौपाटी म्हणजे आदी ची अतिशय लाडकी जागा. एके काळी दीप्ति ची सुद्धा. मुंबई मधल्या इतर चौपाट्यांपेक्षा छोटी आणि स्वच्छ. अरेबियन समुद्राची गाज रानडे रोड वरील ट्राफिक च्या आवाजात मिसळून गेली होती. पण समुद्रावरून येणारा खारा वारा दीप्ती ला आवडे. आदी तिच्या जवळच वाळूत खणत होता.
“ डीडी मी फोल्त बनवलाय.. तू एनयालेश माद्या बलोबल लाहायला ?” जवळ जवळ ५ वर्षांचा झाला तरी आदी ची गाडी अजून “ल” वरच अडकली होती. पण दीप्ती डिड नॉट माइंड. इन फॅक्ट तिला ते आवडायचं.
“ यीप्पी ..आपण फोर्ट मध्ये करायचं काय पण ? “
“ त्लक चालवायचा ..”
“ बरं ! आणि आजी आबा ?”
“ आजी आबाची गाली चालवनाल आनी मी शगलयांचा लाजा !! तू माजी लानी “
दीप्ती ला खुदकन हसू आलं.
तिथेच बाजूला दुसरं एक त्रिकोणी कुटुंब खेळताना त्याला दिसलं
“ ते बग डीडी ..”
“कोण ते ? ते पण आपल्या सारखेच खेळायला आलेत बीच वर “
“ एक ममा एक बाबा आणि एक दीदी हो ना?”
“ हम्म..” दीप्ती ला पुढले प्रश्न दिसायला लागले.
“ माजे ममा बाबा फोतो मदून कदी बाहेल येनाल? “
“.. तुला आइस क्रीम हवंय ?”
“ यीप्पी ..आइश क्लीम् ..”
.. आत्ताची वेळ दीप्ती ने मारून नेली होती. पण केव्हा पर्यन्त?
***************************************************************************************************************************************
केएल नी एमर्जन्सि मीटिंग बोलवल्यावर दीप्ती उघडलेला लंचबॉक्स बंद करून लगेचच त्यांच्या ऑफिस मध्ये गेली.
“ व्हॉट’स् रॉन्ग ?” तिने ऑफिस मध्ये येत येताच विचारले.
“ डेलॉईट कडून मेसेज आलाय. आपल्या मार्केटिंग प्लान मध्ये त्यांना खूप कम्प्लायंस एररस सापडल्या आहेत. तो प्लान तू बनवला होतास ना..देन व्हाय सच एररस?”
“ येस के एल. मी प्लान बनवून यश कडे रिव्यू साठी सबमिट केला होता.”
“आय अंडरस्टॅंड दॅट. आणि यश तू तो प्लान रिव्यू करून स्वतःच्या हिशोबाने बदललास आणि डायरेक्ट डेलऑइट ला पाठवूनही दिलास. “
“ येस के एल”
“ तुझ्या रिव्यू कोंमेंट्स तू डीडी का पाठवल्या नाहीस?”
“..”
“मी तुला विचारतोय यश ..व्हाय डिड यू नॉट सर्कल बॅक विथ अवर मार्केटिंग मॅनेजर ? “
“ बिकॉज शी वूड नॉट हॅव टेकन देम सेरिअसली अँड वूड हॅव सिम्प्लि आरगयूड विथ मी अगेन अँड अगेन ..”
“.. द ग्रेपवाईन इज ट्रू देन ..” सुस्कारा सोडत के एल म्हणाले
“ व्हॉट ग्रेपवाईन? “ यश आणि दीप्ती एकसुरात म्हणाले
“ हेच की म्हात्रे कन्सलटिंग चे असोशिएट वाईस प्रेसिडेंट आणि चीफ मार्केटिंग मॅनेजर हॅव हॅड मेजर फॉल आउट !”
के एल दीप्ती आणि यश कडे आळी पाळीने आणि दीप्ती आणि यश वेगवेगळ्या दिशेत बघायला लागले
“ मी खूप दिवस तुमच्या मधली रिफ्ट ऑब्सर्व करतो आहे. इन फॅक्ट यश जॉइन झाल्या पासून लगेचच. आय अंडरस्टॅंड दॅट तुमच्या वर्किंग स्टाइल्स वेगवेगळ्या आहेत. तुमचे स्ट्रेन्थस् आणि वीकनेससेस वेगळे आहेत. गेली ३ वर्ष मी तुला ग्रूम केलंय दीप्ती. यू हॅव हॅड टेररीफीक contributions इन अवर सोअरिंग सकसेस इन द लास्ट ३ ईयरर्स अँड दॅट टू विदाउट एनी कॉन्फलिकट विथ एनिबडी. टॉकिंग अबाऊट यश त्याचा मास्टर्स इन फायनॅन्स आणि नंतर च्या जॉब एक्सपिरियंस चा ट्रॅक रेकॉर्ड इमपेकेबल आणि इम्प्रेसिव आहे. तुम्ही दोघे ही आपापल्या रोल्स मध्ये इतके परफेक्ट असून आज कम्प्लायंस ऑडिट फेल ची वेळ का यावी कंपनी वर? “
“.. ..” दोघांच्या कडे काहीही उत्तर नव्हते
“ सो हियर इज माय फायनल वर्ड ऑन धिस टॉपिक. व्हॉट एवर इट इज दॅट यू बोथ नीड टु सॉर्ट आउट जस्ट गेट द हेल इट सॉर्टेड. यू बोथ आर नॉट कमिंग आउट ऑफ धिस रूम विदाउट बिकमिंग फ्रेंडस अँड ऑफ कोर्स विदाउट द फ्लॉलेस मार्केटिंग प्लॅन. “
दीप्ती अँड यश काही पुढे बोलणार इतक्यात के एल नी त्यांना चेक मेट दिला
“... ईफ यू आर थिंकिंग अबाऊट resignation .. इट्स ऑलरेडी रिजेकटेड .. सो गेट वर्किंग “
.. ब्लडी मिलेनियल्स .. पुटपुटत के एल ऑफिस च्या बाहेर पडले.
***************************************************************************************************************************************
यश म्हात्रे. द मोस्ट एलईजिबल बॅचलर कॅटेगरी. म्हात्रे कन्सलटिंग ग्रुप चा एकमेव वारस. प्रेसिडेंट के एल म्हात्रे यांचा एकुलता एक नातू. एमबीए इन फायनान्स फ्रॉम नन अदर दॅन लंडन बिझनेस स्कूल.
मास्टर्स पूर्ण करून प्रथितयश कंपनीस् मध्ये अनुभव घेऊन यश मुंबईत परतला होता. का ते त्याचा त्याला सुद्धा ठाऊक नव्हतं. शिवाजी पार्क मधील त्यांच्या प्रशस्त म्हात्रे हाऊस मध्ये राहण्या पेक्षा त्याने रानडे रोड वर एक पेंट हाऊस भाड्याने घेतलं होतं. के एल चं आणि त्याचं विशेष सख्य ही नव्हतं आणि दुशमनी सुद्धा नव्हती. ते दोघे आपापल्या विश्वात एकेकटे जगत होते. त्यांच्यात उरलेला एकमेव दुवा म्हणजे म्हात्रे कन्सलटिंग. भारतात परतल्या वर काहीच दिवसांत यश ने शिवाजी पार्क वर जॉगिंग करणारी आणि उरलेल्या वेळात शॉपिंग आणि सोशलायसिंग करणारी गर्लफ्रेंड सुद्धा पटकावली होती. बेबंध आयुष्य. गाठीशी प्रचंड पैसा. कुणी काही विचारणारं नाही अन कुणी विचारणारं ही नाही.
नाही ऐकून घ्यायची कधी सवयच लागली नाही. स्वतःच्या कुवतीवर प्रचंड विश्वास आणि काहीशी मग्रुरी सुद्धा. दीप्ती शी त्याचं पटलं असतं तरंच नवल ! असोशिएट व्हीपी म्हणून जॉइन झाल्यावर महिन्या भरातच त्याला दीप्ती चा के एल वर असलेला प्रभाव खटकायला लागला. पण दीप्ती ला कुठल्या ही परिस्थितीत बाजूला करणार नाही असं के एल नी निक्षून सांगितल्याने यश चा नाईलाज होता. पुढे मागे कंपनी टेक ओवर करायची तर के एल चा इगो सांभाळायला हवा होता।
आणि रीसेशन च्या भोवऱ्यात असलेल्या जॉब मार्केट मध्ये हातात असलेला उत्तम जॉब टिकवणं दीप्ती ला अत्यंत गरजेचं होतं.
दोघेही पुरे सापडले होते.
***************************************************************************************************************************************
दारावरची बेल वाजली तेव्हा दीप्ती आली असेल असं वाटून लगबगीने सुषमा ताईंनी दार उघडले. उंच पुरा आणि पावसात निथळत उभा असेला तरुण दारात उभा पाहून त्या भ्रमात पडल्या. त्याला आधी आत घ्यावा की आधी नाव गांव विचारावं असा विचार त्या करत असतानाच
“अ/१०३ हिंदू कॉलॉनी हेच का? “ असं त्यानेच पटकन विचारले
“ अं हो .. हाच पत्ता आहे आमचा. तुम्ही? “
“ मी यश म्हात्रे. मी दीप्ती बरोबर काम करतो. दीप्ती च वॉलेट आमच्या कंपनी च्या लिफ्ट मध्ये मला सापडलं. दीप्ती ला कॉल करण्याचा खूप प्रयत्न केला पण ती उचलत नाहीये. ड्रायविंग लायसेंस वरून अॅड्रेस मिळाला म्हणून द्यायला आलो.”
“ओह दॅट्स माइटी नाईस ऑफ यू! दीप्ति प्रचंड काळजीत होती. तिची सगळी कार्डस, आयडीस तिच्या वॉलेट मध्येच होते ना. आत्ता पोलिस complaint करायलाच शिवाजी पार्क पोलिस स्टेशन ला गेली आहे. येतच असेल.. तुम्ही आत या ना. यू आर सोकिंग वेट. हॅव अ कप ऑफ कॉफी अॅट लीस्ट “
“नाही नको .. मी निघतो. गुड नाइट मिसेस दिक्षित. “ असं म्हणत यश निघणार इतक्यात सुषमा ताईंनी विचारले ..” बाय एनी चान्स तुम्ही रुईया कॉलेज चे स्टुडेंट आहात का? “
“.. होय.. आणि तुम्ही पण राइट? दीक्षित मॅडम .. हेड ऑफ द डिपार्टमेंट फॉर इंग्लिश लॅंगवेज”
“ बरोब्बर ! आता तर आत यावच लागेल. “
“ ओके नाऊ इट इज माय प्लेजर ..पण मला तुम्ही नाही तू म्हणा .. कबूल?”
“ एकदम कबूल ! ये ये आत ..”
गच्च भिजलेले शूज आणि मोजे दारा बाहेर काढून यश घरात शिरला आणि त्या वास्तू मधील ऊब त्याला त्याच्या ओल्या कंपड्यांतून सुद्धा जाणवली. सुषमा ताई लगबगीने आत गेल्या आणि यश साठी टॉवेल घेऊन आल्या.
“ अगदी बिनधास्त बस सोफ्या वर. माझा नातू सारखं काहीतरी सांडत असतो त्याच्या वर. त्यामुळे सोफा ओला होईल ह्याची काळजी करू नकोस अजिबात “ यश च्या मनातला विचार सुषमा ताईंनी बरोबर ओळखला होता.
“ काय घेणार? कॉफी की मस्त आलं घालून केलेला चहा?”
“ काहीही चालेल.. पण आय डोन्ट वॉन्ट टु इंपोस रियलि ..”
“ But indeed I would rather have nothing but tea ….आठवलं का?” सुषमा ताईंनी आतून मिश्किल पणे विचारलं.
“.. Jane Austen ? “
“ bravo “ सुषमा ताईंनी चहा आधणावर ठेवता ठेवता आपल्या शिष्या चे कौतुक केले!
स्वयंपाकघरातून येत असलेली भांड्यांची किणकीण ऐकत यश ने डोकं चेहरा हात कोरडे केले आणि तो इकडे तिकडे पाहू लागला.
सुबक मध्यमवर्गीय घर. नीटनेटकं आणि स्वच्छ. कलात्मकतेने सजवलेले. खिडकी जवळच्या कपाटात भरगच्च पुस्तके. तिथेच जवळ एक आरामखुर्ची आणि बाजूला रीडिंग लाइट. त्याच्या एकीकडे एका काचेच्या बंद कपाटात सतार खोळीत घालून ठेवलेली आणि दुसऱ्या बाजूला भिंतीवर गिटार टांगलेले. त्याच्यावर मात्र धूळीचा थर. डायनिंग टेबल च्या मागे छोट्या छोट्या फोटो फ्रेमस् चे कोलाज. त्याचं लक्ष वेधलं ते एका भिंतीने. वॉल ऑफ फेम सारखी. फ्लोटिंग shelves वर मांडून ठेवलेली बक्षिसे आणि ट्रॉफीस्. फ्रेम केलेली certificates आणि स्क्रोलस्. जागोजागी मांडलेली कुंड्यातली झाडे. एका कोपऱ्यात अंथरलेलं रंगीबेरंगी जाजम. काही खेळण्यानी भरलेले खोके आणि छोटीशी बूक केस लहान मुलांच्या पुस्तकांनी मढवलेली. महागडी सुविनियर्स नाहीत. ऊंची फर्निचर नाही. उदबत्तीचा मंद सुगंध आणि शुभ्र लॅम्प शेडस् मधून पाझरणारा शांत प्रकाश. कॉफी टेबल वर एक परडीत पारिजातकाची फुलं ठेवलेली. साधेपणातलं सौन्दर्य यश अधाशासारखा पहात होता. इतक्यात आल्या च्या वासाने दरवळणारा वाफाळता चहाचे कप, नारळाच्या मउसूत वड्या आणि पोह्यांच्या खमंग चिवड्या चा ट्रे घेऊन सुषमाताई बाहेर आल्या.
“ थांब हं बाबा जागे आहेत का ते बघते. त्यांना नक्की तुझी कंपनी आवडेल चहाला” असं म्हणत त्या आत गेल्या आणि व्हीलचेअर वर बसलेल्या सुरेश दीक्षितांना अलगद बाहेर घेऊन आल्या. दाढी केलेले, केस नीट विंचरून छापून चोपून बसवलेले आणि पांढऱ्या स्वच्छ सुती कुडता पायजामयावर हलकेच eu-de- cologne शिंपडलेले सुरेश दीक्षित त्या अवस्थेतही रुबाबदार दिसत होते. मूळचं त्यांच रांगडं आणि मेहनती शरीर paralysis ने सुद्धा लपत नव्हतं. शून्य नजरेने ते त्याच्याकडे पाहत आहेत ही लक्षात आल्यावर यश जरा बावरलाच.
“आय होप यू दोन्ट माइंड हिम विथ उस हियर .. त्यांना तेवढाच नवीन माणसाचा सहवास..” काहीशा अपराधिपणे सुषमाताईंनी विचारलं
“ ऑफ कोर्स नॉट. इट्स माय प्लेजर अगेन. “ असं म्हणत यश ने चहा चा पहिला घोट घेतला आणि त्यांची जणू ब्रंम्हानंदी टाळीच लागली. असा घरचा चहा तो कित्येक वर्षांनंतर पीत होता. सुषमा ताई चमच्याने सुरेश ना चहा पाजू लागल्या. मध्येच त्यांच तोंड रुमालाने हलकेच पुसून घेत त्यांना काहीतरी सांगत होत्या. सुरेश निर्विकार असले तरी सुषमा ताईंच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य मिटत नव्हतं. वासनेच्या पलीकडे गेलेल्या आत्मीय प्रेमाचा तो आविष्कार यश डोळे भरून बघतच राहिला.
“ अरे घे न तू लाजू नकोस .. नारळाची वडी आवडते का? आणि चिवडा तिखट नाहीये न फार? आदी ला काहीतरी बाहेरचं जंक फूड देण्या पेक्षा मी हे स्नॅक्स घरीच तयार ठेवते.” एकीकडे स्वतः चहाचा घोट घेत सुशमाताईंच्या गप्पा सुरूच होत्या.
यश ला आठवलं ba च्या तीनही वर्षी दीक्षित मॅडम त्याला इंग्लिश शिकवायला होत्या. एरवी अत्यंत फाजील असलेला त्यांचा क्लास इंग्लिश च्या तासाला मात्र कमालीचा सीनसियर व्हायचा. मॅडम च्या व्यक्तिमत्त्वाचा हा प्रभाव होता, त्यांच्या इंग्लिश वरच्या प्रभूतत्वाचा की शिकवण्याचा हातखंडयाचा माहीत नाही पण दीक्षित मॅडम ची कुणी कधी टवाळी केली नाही. कडक इस्त्री ची सूती किंवा सिल्क साडी पद्धतशीर नेसलेली. इकडची निरी तिकडे नसलेली. तसेच कायम आवरलेले अंबाड्यात आवरलेले केस. हातात फक्त एक घडयाळ. कानात छोट्या श्या कुड्या आणि छोटी लाल टिकली. बघत राहावं असं रेखीव व्यक्तिमत्त्व आणि तितकंच मृदु बोलणं. मॅडमच्या केसांची झालेली चहा साखर आणि डोळ्यांखालची काळी वर्तुळे सोडली तर त्या तश्याच होत्या. इतक्या अनपेक्षित रीतीने त्या पुन्हा भेटतील असं यश ला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. ऋणानुबंधांच्या गाठी समोर येतात त्या अश्याच अवचितपणे. ..
- भाग २
|| क्रमशः||
मस्त सुरु आहे. स्पीड पण
मस्त सुरु आहे. स्पीड पण चांगला आहे. पुढे काय होणार ह्याचा अंदाज आलाच.
देणं - भाग १https://www
देणं - भाग १
https://www.maayboli.com/node/73867
वाचतोच. खंड न पडू देता, पुढील
वाचतोच. खंड न पडू देता, पुढील भाग लवकर टाका.
छान सुरू आहे.
छान सुरू आहे.
तुम्ही धागा उघडला की वर 'संपादन' येईल तिथे जाऊन पुढच्या/मागच्या भागांच्या लिंक्स देऊ शकता मूळ धाग्यातच.
छान चाललीये कथा, पुढचे भाग
छान चाललीये कथा, पुढचे भाग टाका लवकर, वाट पाहतेय.
दोन्ही भाग छान !
दोन्ही भाग छान !
छान वेग पकडला आहे कथेने
छान वेग पकडला आहे कथेने
छान. पुभाप्र.
छान. पुभाप्र.
उत्तेजना साठी मनापासून आभार
उत्तेजना साठी मनापासून आभार मित्रहो!
देणं भाग ३ :-
https://www.maayboli.com/node/73894
छानच लिहिताय. एकदम रिफ्रेशिंग
छानच लिहिताय. एकदम रिफ्रेशिंग स्टाइल.
छानच. तरुणाईची तरतरीत गोष्ट.
छानच. तरुणाईची तरतरीत गोष्ट.