तुझी आठवण येते पण,

Submitted by shubham shirsat on 27 March, 2020 - 13:27

तुझी आठवण येते पण,
तु समोर येत नाहीस...
तु माझ्या हरेक श्वासात येतेस,
पण, प्रत्यक्षात नाहीस..
तु येण्याचा मला भास
होतो, पण, तु दिसत नाहीस..
वेदना खुप होतात गं माझ्या
मनात, पण, तु त्यांना समजुन घेण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाहीस..
आभाळ खुप जोरात गरजतं
पण, पाऊस पडत नाही,
तुला आपलं करून घ्यावसं वाटतं,
पण, तु माझ्या नशिबात नाहीस...

Group content visibility: 
Public - accessible to all site users