संकेत (शतशब्दकथा)

Submitted by स्वप्ना_राज on 27 March, 2020 - 10:15

‘जपून जा ग’ आजीने चेहरयावरून हात फिरवत म्हटलं.

‘आजी, रडू नको ना. माझा पाय नाही निघायचा’ प्राचीच्या डोळ्यांतही पाणी होतं.

‘बरं बाई, पोचल्यावर फोन कर’

‘करते, नको काळजी करू’ प्राचीने नमस्कार केला.

गाडी वळेपर्यंत हात हलवणार्या आजीकडे पाहून तिला पुन्हा अस्वस्थ वाटलं. काल रात्रीपासून का कोणास ठाऊक पण आजी आपल्याला परत दिसणार नाही असं तिला आतून सारखं वाटत होतं.

‘काहीही होणार नाहीये तिला. चांगली शंभरी पार करेल ती’ प्राची स्वत:शीच पुटपुटली.

हायवेला लागून एखादा तास झाला असेल. जोराच्या धक्याने तिला जाग येईतो गाडीने रस्ता सोडला होता.

पाच-सहा कोलांट्या मारून गाडी थांबली तेव्हा अखेरच्या क्षणी तिच्या डोळ्यांसमोर आजीचा चेहेरा होता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Aaiggg