जिंकू ही कठीण लढाई

Submitted by द्वैत on 26 March, 2020 - 02:55

जिंकू ही कठीण लढाई

भर दिवसाढवळ्या निजले
शहरातील रस्ते सारे
अन गल्लोगल्ली फिरती
मोकाट भयानक वारे

भीतीने गेली थांबून
धडधडती जीवनरेखा
तुम्ही घरात थांबून आता
पत्त्यावर पत्ते फेका

माणूस हरवला कोठे
प्राण्यांना पडले कोडे
बरी अद्दल घडली ह्यांना!
ही कुजबुज करती झाडे

हा एक विषाणू साऱ्या
दुनियेवर पडला भारी
अन बदलून गेली अपुली
बघ जीवनशैली सारी

हा उभ्या जगाचा वैरी
स्पर्शातून पसरत जाई
थांबून घरातच आपण
जिंकू ही कठीण लढाई

Group content visibility: 
Public - accessible to all site users