Submitted by मी अभिजीत on 26 March, 2020 - 02:18
दिखावाच आहे मुजोरी तुझी
स्वत:लाच शिक्षा अघोरी तुझी
तसेही गमवणार काळीज मी
कशी तू लपवणार चोरी तुझी
किती बोलके दैन्य होते तुझे
किती गप्प असते तिजोरी तुझी
निरोपात आहे खुशाली अशी
जणू वेदना पाठमोरी तुझी
किती मांडणे, पाडणे, मांडणे
सुरू जीवनाशी लगोरी तुझी
कळालेच नाही तुझे प्रेम जर
कळावी कशी बंडखोरी तुझी
किती मायन्याशी झगडशील तू
मला धाड चिठ्ठीच कोरी तुझी
-- अभिजीत दाते
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
नितांत सुंदर गझल
नितांत सुंदर गझल
सुंदर गझल
सुंदर गझल
अप्रतिम
अप्रतिम
सुपर
सुपर
वाह वाह! अत्युत्कृष्ट गझल.
वाह वाह! अत्युत्कृष्ट गझल.
लगोरी आवडली.
लगोरी आवडली.