अमेरिकेत करोनाची सद्यस्थिती आणि प्रशासन करत असलेल्या उपाययोजना

Submitted by atmaramvitekar@... on 23 March, 2020 - 01:03

आपले बरेच माबोकर अमेरिकेत स्थायिक झालेले आहेत. कामानिमित्त तिकडे तात्पुरते स्थायीक झाले आहेत. विमान वाहतूक खूप मोठ्या प्रमाणावर तिकडे चालते. तर मी तिकडील माबोकरांना विनंती करतो की तिकडची परिस्थिती कशी आहे, प्रवासी लोकांना काही त्रास होतो आहे काय, तिकडील प्रशासन करोना प्रसाराला पायबंद घालण्यासाठी काय काय प्रयत्न, उपाययोजना करत आहेत. तिकडे कोणत्या सुचना दिल्या आहेत. जनता कशी रिअॅक्ट होत आहे. हे लिहिले तर आमच्या सारख्यांना माहितीचा उपयोग होईल.
धागा काढण्याचं कारण म्हणजे अमेरिकेत भयानक वेगाने करोना पसरला आहे असं वाचनात आले. धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults