मी आसारामबापू चा शिष्य बनलो होतो ( भाग चार)

Submitted by atmaramvitekar@... on 20 March, 2020 - 09:48

मंत्रदीक्षा घेतल्यावर मी रेग्यूलर जप वगैरे करत होतो. बापूचा सत्संग जिकडे असेल तिकडे रजा घेऊन जात होतो.‌ एकदा वरीष्ठांनी विचारले एवढं रजा टाकून जातोस, बापू तूला ओळखतो का? मी म्हटलं माझ्या समाधानासाठी जातो. मला बापू बोलावत नाही. सहकारी म्हणायचे बापू व्यापारी आहे. च्यवनप्राश, अगरबत्ती, साबणं विकतो. मी त्यांना म्हणत असे की, अरे त्या वस्तू केवळ साधकांसाठी असतात. त्यावर तसं लिहिले आहे. तुम्हाला कोणी घ्या म्हणतंय का? तरी पण लोक काशीधुप अगरबत्ती मिळेल का, गोमूत्र मिळेल का हे विचारायचे.
असं हळूहळू चाललं होतं. मी आसाराम बापू ची दीक्षा घेतली आहे हे माझी पत्नी, सासुरवाडी चे लोक यांना चांगलेच वाटत होते. मी कोणत्याही नातेवाईकांना, पत्नीला दीक्षा घ्या म्हणून आग्रह करत नव्हतो. माझे कैक जोडीदार दारु पित असत, मांसाहार करत असत. मी त्यांना कंपनी देत असे. सोडा किंवा थम्प्स अप पित चकना ( शाकाहारी) खात असे. कोणालाही त्याच्या एन्जॉय पासून परावृत्त करायचे नाही हे माझं मत होतं आणि आहे. एकदा तर पार्टीकरताना मित्र इतके पिले की जेवता येईना. मग मी प्रत्येकाला मटणाचे ताट वाढून दिले. ते व्यवस्थित जेवले. मी माझ्या साठी श्रीखंड आणले होते. मित्र म्हणत बाप्या लका तू खरंच लै खतरनाक माणूस आहेस.
मला बापूच्या व्हिसीडीज आणायचा नाद होता. एकदा व्हिडीओमध्ये दाखवलं की बापू डीसा गावामध्ये रहात असताना सत्संगात एकानं त्याग, वैराग्य काय म्हणून विचारले तर बापू अंगावरचे कपडे टाकून तिथून लंगोटिवर निघून गेला. माझ्या मनात विचार आला मग आता बापूला एवढे मोठे फाईव्ह स्टार आश्रम आणि अलिशान गाड्या कशाला हव्या असतात.? बापूनं सगळ्याचा त्याग केला पाहिजे. पुढे बापू वेगवेगळ्या प्रकरणात अडचणीत येऊ लागला. शेवटी बलात्कार की विनयभंग हा प्रकार घडला. तेव्हा बापू तीन दिवस पोलिसांना गुंगारा देत पळत होता. ते पाहून मी फार कष्टी झालो. अरे हा स्वत:ला ब्रह्मनिष्ठ आत्मसाक्षात्कारी संत म्हणवून घेतो आणि गुन्हेगारासारखा दूर पळतोय. कर नाही त्याला डर नाही असे वागायचं सोडून डरपोकासारखा पळतोय. तेव्हाच बापू मनातून कायमचा उतरला. पुढे पुढे विरोधी साक्ष देणारांची सुध्दा हत्या करण्यात आली.
मी तेव्हापासून बापूला गुरुपदावरुन दूर केले.
समाप्त. धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

परसू भाऊ अध्यात्म तुमच्यात होतं पण दुर्दैवाने तुम्हाला गुरू चुकीचा भेटला. पण मला पूढे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही तुमची अध्यातमीक साधना पुढे कशी चालू ठेवली? तुम्हाला योग्य गुरू मिळाला की तुम्ही एकला चलो रे मंत्र जपत पुढे प्रवास सुरु ठेवला. तुम्हाला तुमच्या अध्यात्मिक भुकेने नक्कीच गप्प बसून दिले नसेल. ही लेख मालिका आसाराम पर्यंत सीमित न ठेवता " माझा अध्यातमीक प्रवास" आशा नावाने पूढे सुरू ठेवावी.
लेखन नेहमीप्रमाणे उत्तम.

आसाराम पर्यंत सीमित न ठेवता " माझा अध्यातमीक प्रवास" आशा नावाने पूढे सुरू ठेवावी.
लेखन नेहमीप्रमाणे उत्तम.

Submitted by झम्प्या दामले on 20

शब्दाची काटकसर करू नका.
लेखन फक्त उत्तम नाही आणि तर अतिउत्तम आहे.
आपले भाग्य थोर की अशा महान लेखकाचे लेखन आपल्याला सहज वाचायला मिळत आहे

प्रशांत भाऊ आपल्या प्रतिसादातला उपरोध लक्षात न येण्याइतका माझा आयक्यू कमी नाही म्हंटलं. कसेंS?

रागावू नका.
सामान्य लोकांकडून (, आमच्या सारख्या) होतात चुका आपण मोठ्या मनाने सभाळून घ्यायचं माफ करायचे .

अरे मी म्हटलं का मी ब्रह्मचर्य पाळत होतो म्हणून? कार्यक्रम सुरू होता. तुझ्यासारखी साडेसाती नाही लागली कधी माझ्या मागे.
मला वाईट वाटतं मी बापूचा फक्त पाच-दहा टक्के शिष्य बनलो होतो.

काढले असते शंभर धागे. त्यात तूझ्या पप्पाचं काय गेलं असतं? माबो थोडीच तूझ्या पप्पांच्या मालकीची आहे?

घरातच रामनाम घे,

घर सोडले म्हणून प्रत्येक पुरुषाचा मोदी अन योगी होत नाही , आणि प्रत्येक बाईची शिंदुताई सपकाळ किंवा सुलभा महाजन होत नाही.

तू तूझा धर्म पाळ. माझं माझ्यावर सोड. इंद्रियांचे तुष्टीकरण करता करता तूझं माकड झाले आहे. एकदा आरशात तोंड बघ तूझं.

मी कंटाळलो यार तूला. रस्त्यावर च्या कुत्र्याला तुकडा टाकला की ते मागं मागं तुकड्याच्या आशेने येते तसा तू लोचट कुत्रा आहेस.‌ हाकलले तरी पिच्छा सोडत नाही.

बरं मग सासऱ्याचे वीस गुंठे मिळाले का? तूतर भूमीहीन आहे. तूझा डोळा त्या इस्टेटीवर. पण वाटेकरी भरपूर म्हणल्यावर तुझा जळफळाट साहजिकच आहे.

एव्हढा माज बरा नव्हे blackcat. तुझ्या भोगवादी धर्माला थेट मक्केत कर्फ्यु लागला ते विसरलास की काय? की तिकडच्या प्रथम दर्जाच्या श्रद्धावान लोकांनी सुमार दर्जाच्या लोकांना बेदखल केलंय?

मी परसू भाऊंना विनंती केली आहे की ही लेख मालिका त्यांच्या अध्यात्मिक प्रवासाबाबत continue करावी. पहिल्या कमेंट मध्ये दिसेल.

Pages