मी आसाराम बापू चा शिष्य बनलो होतो ( भाग तीन)

Submitted by atmaramvitekar@... on 20 March, 2020 - 00:01

मी बापूचा शिष्य का बनलो? तर माझा एक नातेवाईक ( त्यानं नंतर खरी हकीकत सांगितली होती. ) पहिल्या ने शिष्य बनला. त्यानं एका मुलीला प्रपोज केले तर त्या मुलीनं तिच्या घरच्यांना सांगितले की त्यानं तिच्यावर बळजबरी केली. तिच्या घरच्यांनी त्याला खूप कुटलं. मग तो बरेच दिवस गायप होता. दोनेक वर्षांनी गावाला आला. एकदम बदलून गेला होता. स्वच्छ पांढरेशुभ्र कपडे, गळ्यात स्फटिकाची चमचम करणारी माळ, कपाळावर चंदनाचा टिळा! दाढी वाढलेली, खूप प्रभावशाली दिसत होता व निर्भयपणे आसारामायण, गुरुगीता यांचा पाठ करत असे. माळेवर जपही नेमानं करत होता. अनेक पुस्तके, सिड्या, कॅसेट्स त्यानं आणल्या होत्या. त्याचं पाहून माझे चुलतेही बापूंचे शिष्य बनले. मी त्यांच्या कडून पुस्तके आणून वाचत असे, टेपवर कॅसेट ऐकत होतो.
मला बालपणापासून तंबाखू खाण्याचा शोक होता. पंढरपुरी सोनेरी तंबाखू खाल्ली नाही तर मला अजिबात चैन पडत नव्हती. घरच्याना माझं व्यसन आवडत नव्हते आणि मला सुद्धा तंबाखू सोडायची होती. कधीकधी तीन महिने बंद करत होतो पण परत जोरात तंबाखू खायला चालू करत असे. अशातच बापूंच्या एका पुस्तकात व्यसनं सोडण्याचे आणि बापूंनी व्यसनं सोडवल्याचे अनुभव भक्तांनी लिहिले होते. ते पाहून मी सुद्धा बापूला मनापासून प्रार्थना केली की माझं हे घाण व्यसन सुटू द्या. मी या विचाराला आलो होतो की एकवेळ दारु सुटेल पण तंबाखू सोडणे महाकठीण काम आहे.
त्या दिवसापासून तंबाखू खाण्याचे बंद झाले. मी खूप आनंदलो. बापूंमुळं तंबाखू सुटलं. मग मी दोन रुपयांना मिळणारे बापूंचं व्यसनमुक्ती वरचं पुस्तक लोकांना वाटू लागलो.
माझ्या नातेवाईकानं मला तू आता दीक्षा घे. तूझं जीवन आमुलाग्र बदलून जाईल असे सांगितले. मलाही त्याचं बोलणं आवडलं आणि मी मंत्रदीक्षा घेण्याचं ठरवलं.
क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

तुमच्यातील ह्या लपलेल्या लेखकाचे आम्हा पामराना भारी कौतुक वाटतं.
काय ते शब्द वापरण्याचे कौशल्य केवढे ते शब्द भांडार .
केवढी ती तीव्र बुध्दी मत्ता.
तुम्ही भारताची नाही तर जगाची शान आहात

केवढी ती तीव्र बुध्दी मत्ता.
तुम्ही भारताची नाही तर जगाची शान आहात
Submitted by prashant255 on 20 March, 2020 - 02:51
>>> खूप खूप धन्यवाद.