समांतर (वेब सिरीज) - Starring स्वप्निल जोशी !!! (चर्चेत स्पॉईलर असतील)

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 March, 2020 - 20:13

लंडनहून जॉन काय म्हणतो बघा -

जॉन - आधी मला स्वप्निल जोशी आवडायचा नाही. तो स्वत:ला मराठीचा शाहरूख खान समजायचा आणि चॉकलेट बॉय बनायचा प्रयत्न करायचा. पण मला तो ओवरॲक्टींग करतोय असे वाटायचा... आणि मग माझ्या एका मित्राने मला "समांतर" ही वेब सिरीज बघायचा सल्ला दिला.

........ आणि आता मला स्वप्निल जोशी फार्र फार आवडू लागला आहे. एक सीजनचे आठनऊ एपिसोड मी एका रात्रीत एका दमात बघून संपवले आहेत. आणि आता पुढच्या भागाची प्रतीक्षा आहे.

तुम्हीही खाली दिलेल्या लिंकवर टिचकी मारून MX Player वर समांतर बघू शकता.

Fantastic videos from MXPlayer
[Samantar (Marathi)] https://www.mxplayer.in/show/watch-samantar-series-online-f706cad4e65256...

समांतर का बघावी -

१) स्वप्निल जोशीचा वर्णनापलीकडचा अभिनय आणि अदाकारी

२) ऊत्क्ंठावर्धक कथा आणि तितक्याच ताकदीची मांडणी

३) सतीश राजवाडे यांचे खिळवून टाकणारे दिग्दर्शन

४) तांत्रिकदृष्ट्या सरस असलेली एक मराठी कलाकृती

आता का बघू नये?

१) नवाझुद्दीन सिद्दीकीला लाजवेल अश्या स्वप्निलने हासडलेल्या शिव्या आणि त्याचे तेजस्विनी पंडितसोबत हाशमीच्या थोबाडात मारतील असे दोनतीन कडक किसिंग सीन

२) बघून सांगा, आणखी काही नाव ठेवायला सापडतेय का? Happy

स्वप्निल जोशी आणि नितीश भारद्वाज या दोन कृष्णांची कहाणी. जो एकाचा भूतकाळ तोच दुसरयाचा भविष्यकाळ. जवळपास तीसेक वर्षांच्या अंतराने समांतर चाललेली दोन आयुष्ये. बघायला चुकवू नका.
धन्यवाद,
ऋन्मेष

जिओ स्वप्निल !!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नव्या हिरवींनी

म्हणजे , अलका कुबल , निशिगंधा वाड , वर्षा उसगावकर इ इ च्या नंतर झालेल्या त्या सर्व नवीनच

काल अगदीच राहावले नाही म्हणून पहिला एपिसोड पाहिला.

स्वप्निल आपल्या बायकोला चक्क आयाबहिणीची शिवी घालतो Uhoh

- शिवी अ‍ॅलर्ट -

.

चक्क भें#चो#द बोलतो Uhoh

.

अ‍ॅलर्ट संपला

@ प्रभूदेसाई,
पण एका सीन मध्ये तो आणि बाविसकर भसा भसा सिगारेट ओढताना दाखवले आहेत. हे टाळता आले असते तर बर झाल असत.
>>>>>>>
ते ग्लॅमरस न दिसता फार ओंगळवाणे दिसते. त्यामुळे सिगारेट ओढणे घाण दिसते असा संदेश जातो. त्यामुळे ओके वाटले.

बाकी किस वगैरे ठिक आहे, हल्ली पंधरा सोळा वर्षांची मुलेही ईथे पब्लिकली किस घेताना दिसतात. मी ऑफिसहून ट्रेनने यायचो त्या काळात माझ्या समोरच्या सीटवर मी कित्येक किसा पाहिल्यात.

पहिल्या भागाच्या शेवटी सईची एंट्री,, काई सॉल्लिड दिसतेय... बस्स मग तिथेच पॉज करून तिचे रूप डोळ्यात साठवून झोपी गेलो Happy

शिव्या पण उगीच 'लाडूत बेदाणे हवेच, त्याशिवाय आपल्याकडे समृद्धी आहे हे कसे कळणार आळीतल्यांना' या आवेशाने पेरलेल्या आहेत.
अर्थात हेच सगळे आपण हिंदे वेब सिरीज मध्ये चालवून घेतो तर मराठीने काय घोडे मारलेय.

अजून काही शतकांनी "पूर्वी पृथ्वीवरील कुठले लोक किती प्रगत आणि ओपन माइंडेड होते" हे त्या लोकांनी तेव्हा बनवलेल्या वेबसिरीज बघुन त्यात किती शिव्या आणि नग्नता होती यावरून ठरवणार आहेत.

ते ग्लॅमरस न दिसता फार ओंगळवाणे दिसते. >>> खरंय Happy
"सिगरेट ही अशी ओढायची बरं का" याचा नुकताच एक डेमो घेऊन कॅमेरा समोर येउन ओढायला लागले असं वाटतं.

स्वजो शिव्या देताना किती क्युट दिसलाय किंवा अन्य वाक्य अजून तरी आलेले नाही.
बहुतेक त्याचा चेहरा रॉकवेल बेंच जॉ व्हाईस मधे पकडून दोन्हीकडून कॉम्प्रेस केला तर त्याचा सध्याचा झपाटलेला लुक जाऊन लहानपणीच्या कृष्णाप्रमाणे क्युट दिसू लागल्यावर अशी वाक्ये पुन्हा वाचायला मिळू शकतील.

हल्ली शिव्या आणि सेक्स हे अभिजात साहित्याचे निकष झाले आहेत. "श्यामची आई" हे पुस्तक शिव्या आणि सेक्स टाकून संपादित केल्यास नवीन पिढी आवडीने वाचेल.शिव्या आणि सेक्स हे प्रसिद्धीचे शॉर्ट कट झाले आहेत. विज्ञान कथा आणि त्यात शिव्या आणि सेक्स पहिल्यांदाच बघतो आहे.

अबे xxxल्या श्याम, पायाला घाण लागू नयेस म्हणून जपतोस तशी xxxला लागू नये म्हणून जप की रे xxच्या! - असं केलं तरच नवीन पिढी वाचेल, असं म्हणणं आहे का? काहीही!

शामला सदाचाराचे महत्व पटवून देताना त्यांचे गुरू लैंगिक विचार म्हणजे काय हे तपशीलवार दाखवावे लागेल. या विचारांपासून दूर रहायचे असते हे नीट समजून देण्यासाठी ही वेबसिरीज क्रांतीकारी ठरू शकेल.

@ प्रभूदेसाई,
पण एका सीन मध्ये तो आणि बाविसकर भसा भसा सिगारेट ओढताना दाखवले आहेत. हे टाळता आले असते तर बर झाल असत.
>>>>>>>
ते ग्लॅमरस न दिसता फार ओंगळवाणे दिसते. त्यामुळे सिगारेट ओढणे घाण दिसते असा संदेश जातो. त्यामुळे ओके वाटले.>>>>
ऋन्मेऽऽष, तुम्ही म्हणजे अगदी प्रति "पूरब पश्चिम " वाले मनोजकुमार शोभता.

तुम्ही म्हणजे अगदी प्रति "पूरब पश्चिम " वाले मनोजकुमार शोभता. >>> संस्कारांचे महत्व पटवून सांगताना वाईट संस्कार तपशीलात जाऊन दाखवणे ही त्यांची शैली होती.

एवढा काही भारी नाही वाटला दुसरा सिझन. ती कुठली तरी गोष्ट आहे ना एकाच्या डोक्यावरचं चाक दुसर्याच्या डोक्यावर जातं तसंच आहे हे. माबोवर पण हल्लीच झालेय अशी गोष्ट.
स्वजोला अशा निगरगट्ट, मुजोर भुमिका शोभतायत हल्ली. No more a chocolate hero i guess. शिव्या जबरदस्तीने द्यायच्या म्हणून दिल्यासारख्या वाटतात, OTT चा आब राखायला. म्हणून खटकतात. Erotic scenes पण तसेच.
सईचा लुक छान आहे. तेजस्विनीचा अजिबात नाही.

एकाच्या डोक्यावरचं चाक दुसर्याच्या डोक्यावर जातं तसंच आहे हे. माबोवर पण हल्लीच झालेय अशी गोष्ट. >>> पाहण्यात नाही आली. संदर्भ द्याल का ?

एकाच्या डोक्यावरचं चाक दुसर्याच्या डोक्यावर जातं तसंच आहे हे. माबोवर पण हल्लीच झालेय अशी गोष्ट. >>> पाहण्यात नाही आली. संदर्भ द्याल का ?>>>> मला लिंक नाही देता येत. कथेचं नाव 'मुखवटा(रहस्यकथा)' असं आहे.

स्पॉयलर नकोत
एडिट करा>>> अनू, धाग्याच्या शिर्षकातच वॉर्निंग दिलेय की. Happy स्पॉयलर्स असतील.
किती स्पॉयलर्स मिळाले तरी ते कसं घडेल हे बघण्यात मजा येतेच की.

ही आहे ती लिंक https://www.maayboli.com/node/78904
ही झाली रूपक कथा. मूळ कथा मला वाटत जातक कथा असावी. नॉट शुअर. एक माणूस संपत्तीच्या शोधात फिरत असता एके ठिकाणी येतो, तिथे एकाच्या डोक्यावर चाक फिरत असते. तो त्याला म्हणतो "बर झाले तू आलास. माझी सुटका झाली." चाक त्याच्या डोक्यावरून नवीन बळीच्या डोक्यावर जाते.
ज्यांनी सिझन १ एपिसोड १,२,३ पहिले असतील त्यांच्यासाठी हे स्पॉयलर थोडेच आहे?

ओह ओके ओके
हा स्पॉयलर वाला धागा आहे. आता पाहिले शीर्षकात.
यावर चालू द्या.

हो

पण तो ज्योतिषी किती वर्षे जगणार ? तो जयंत सावरकर ना ?

हे तिघेही सुटेसुटे आणि एकत्रही पकाव वाटतात. तरीही बघेन कथेसाठी.
अनावश्यक बेडसीन्स वैगेरे फक्त आम्ही पण करु शकतो हे दाखवण्याचा अट्टाहास.
नवीन Submitted by सस्मित on 1 July, 2021 - 12:38

बोल्ड केलेलं पहिलं वाक्य अजून एका त्रिकूटाकरिता सूट होतंय...

आणि हो कदाचित दुसरं सुद्धा....

#महावसूली

४ एपिसोड पाहिले.
बोल्ड सीन्स मध्ये बरेच पुढे आहेत.
कथा जरा सावकाश सरकतेय.

अनु पळवत पळवत बघायला हवी म्हणजे. जर सावकाश कथा पुढे सरकत असेल तर, माझ्याकडे फार पेशन्स नाहीयेत .

हो >>> धन्यवाद BLACKCAT .

तो जयंत सावरकर ना >>> हो ते कलाकार जयंत सावरकर आहेत.

दुसरा एपिसोड आटोपला.
नितीश भारद्वाज अगदी रासलीला करणारा दाखवलाय
बालकृष्ण स्वप्निल मात्र एकपत्नीव्रता मोडमध्ये दाखवला आहे.
पहिलीवाली सई एकदम चुम्मा दिसतेय. तिच्यासाठी कंपलसरी बघायलाच हवा हा पुर्ण सीजन.
दुसरी सई आता तिसरया एपिसोडपासून जास्त दिसेल.
दोन्ही बिनधास्त कॅरेक्टर आहेत. दिग्दर्शक निर्मात्याचे लक्ष लक्ष आभार दोन्हीकडे सईच घेतलीय.
बाकी स्वप्निल-तेजस्विनी नवरा-बायकोचा चु आणि भे चा लाडीक संवाद कायम आहे. पण तेजस्विनी बापालाही म्हणते बाबा बोअर करू नका हे विशेष आवडले.
मराठी नवरा बायको लाँग डिस्टन्स रिलेशनशिप मेनटेन करायला फोनसेक्स करतात हे दाखवणे आपण योग्य दिशेने प्रवास करत असल्याचे लक्षण आहे. आणखी किती दिवस संस्कार आणि संस्कृतीचा दिखावा करत बसायचे मराठी मालिकांनी.

ता.क. - दुसरया भागाच्या शेवटी एक बेडसीन आहे आणि तो बिलकुल अनावश्यक नाहीये. कारण त्या बेडसीनचा आणि एपिसोडचा धक्कादायक शेवट..... ईश्श सांगणार नाही. स्वत:च बघा Happy

Pages