समांतर (वेब सिरीज) - Starring स्वप्निल जोशी !!! (चर्चेत स्पॉईलर असतील)

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 March, 2020 - 20:13

लंडनहून जॉन काय म्हणतो बघा -

जॉन - आधी मला स्वप्निल जोशी आवडायचा नाही. तो स्वत:ला मराठीचा शाहरूख खान समजायचा आणि चॉकलेट बॉय बनायचा प्रयत्न करायचा. पण मला तो ओवरॲक्टींग करतोय असे वाटायचा... आणि मग माझ्या एका मित्राने मला "समांतर" ही वेब सिरीज बघायचा सल्ला दिला.

........ आणि आता मला स्वप्निल जोशी फार्र फार आवडू लागला आहे. एक सीजनचे आठनऊ एपिसोड मी एका रात्रीत एका दमात बघून संपवले आहेत. आणि आता पुढच्या भागाची प्रतीक्षा आहे.

तुम्हीही खाली दिलेल्या लिंकवर टिचकी मारून MX Player वर समांतर बघू शकता.

Fantastic videos from MXPlayer
[Samantar (Marathi)] https://www.mxplayer.in/show/watch-samantar-series-online-f706cad4e65256...

समांतर का बघावी -

१) स्वप्निल जोशीचा वर्णनापलीकडचा अभिनय आणि अदाकारी

२) ऊत्क्ंठावर्धक कथा आणि तितक्याच ताकदीची मांडणी

३) सतीश राजवाडे यांचे खिळवून टाकणारे दिग्दर्शन

४) तांत्रिकदृष्ट्या सरस असलेली एक मराठी कलाकृती

आता का बघू नये?

१) नवाझुद्दीन सिद्दीकीला लाजवेल अश्या स्वप्निलने हासडलेल्या शिव्या आणि त्याचे तेजस्विनी पंडितसोबत हाशमीच्या थोबाडात मारतील असे दोनतीन कडक किसिंग सीन

२) बघून सांगा, आणखी काही नाव ठेवायला सापडतेय का? Happy

स्वप्निल जोशी आणि नितीश भारद्वाज या दोन कृष्णांची कहाणी. जो एकाचा भूतकाळ तोच दुसरयाचा भविष्यकाळ. जवळपास तीसेक वर्षांच्या अंतराने समांतर चाललेली दोन आयुष्ये. बघायला चुकवू नका.
धन्यवाद,
ऋन्मेष

जिओ स्वप्निल !!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि परवा चला हवा येऊ द्या मध्ये काहीतरी कुटुंबप्रमुख वगैरे म्हणून स्वतंत्र मोठ्या खुर्चीवर त्याला बसलेले बघून तर खात्रीच पटली
>>>>

सही... रिस्पेक्ट !
आमच्याकडे मराठी मालिका चॅनेलच घेतले नाहीयेत त्यामुळे दिसत नाही. युट्यूबवर आहे का बघायला हवा हा एपिसोड

सई मध्ये जाड होती पण आता मस्त मेन्टेन करून आहे फिगर...
>>>>
तिला कशीही फिगर शोभते हे सुद्धा तितकेच खरे आहे. तिच्या चेहरयातच एक मादकता आहे. पण मला झिरो फिगर सईपेक्षा हेल्दी फिगरवालीच जास्त आवडते. ते तिचे ओरिजिनल सौंदर्य आहे .. बदाम बदाम बदाम Happy

परवा चला हवा येऊ द्या मध्ये काहीतरी कुटुंबप्रमुख वगैरे म्हणून स्वतंत्र मोठ्या खुर्चीवर त्याला बसलेले बघून तर खात्रीच पटली >>> हा आता कुठला कुटुंबप्रमुख, कुठली सिरीयल का reallity शो करतोय की काय. झीला trp अजून खाली आणायचा आहे का, त्याचे प्रयत्न सुरु आहेत का.

हायला! मस्त आहे सैमी!
आता ए सर्टिफिकेट घ्यावं लागेल वाटतं ह्या वेसि ला

दुसरी स्त्री: सैयमी खेर

>> अगागागा.. "चोक्ड" मध्ये हिचा एरंडेल चेहरा बघून चोक व्हायची वेळ आलेली. एकदम शुन्य भाव चेहेर्‍यावर.

कडक !
मी माझ्या आयुष्यात आतापर्यंत एकच वेब सिरीज पाहिली आहे
Waiting for part II Happy

समांतर दुसरा आणि अंतिम सीजन रीलीज झाला आहे मित्रांनो
एम एक्स प्लेअरवरच बघू शकता
लाभ घ्या
मी या विकेंडला रात्रभर जागून बघेनच. त्या आधी कोणी स्पॉइलर्र्स टाकू नका बस्स Happy

मलाही आज रात्रीच बघायची ईच्च्छा होतेय, पण मग उद्या सुट्टी टाकावी लागेल. कारण सलग बघायचेय मला. गेल्यावेळीही हेच केलेले Happy

सैमी का सयामी खेर येणार होती ना? सई पुईचा नंबर कस्काय लागला?
हे तिघेही सुटेसुटे आणि एकत्रही पकाव वाटतात. तरीही बघेन कथेसाठी.
अनावश्यक बेडसीन्स वैगेरे फक्त आम्ही पण करु शकतो हे दाखवण्याचा अट्टाहास.

सई मला रेट्रो अवतारात, तो जुन्या स्टाईल चा हेअरडू वगैरे, त्यात छान दिसली ट्रेलर मध्ये.
स्वप्निल जोशी बरोबरच्या अवतारात जरा बारिक वाटते, कॉलर बोन्स खूप दिसतात. (अर्थात तिने प्रयत्न पूर्वक केलेली हॉट फिगर आहे ती.त्यातही चांगलीच दिसते.)

हे तिघेही सुटेसुटे आणि एकत्रही पकाव वाटतात > Lol
काही रापचिक स्टीमी पाहायला मिळेल ह्या अपेक्षेने पळवून पाहिली आणि शेवटी ते पांचट सीन्स सापडले फक्त. मराठीत न्युडसीन दिसायला वीसेक वर्षे लागतील अजून.

शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊनही मराठी संस्कृती धोक्यात आलेली कशी काय चालते यांना ? शिवरायाचं नाव घेता आणि तुमच्या राज्यात हे धंदे ?

मि बघत आहे.

मोबाइलवर बघत आहे

पीसीवर कसा बघायचा ?

ह्याला व्हात्सपवर तिचे फोटो येतात म्हणे

सुहास शिरवळकरनि लिहिले त्या काळात व्हात्सप नव्हते, मग मूळ काद्ण्बरीत काय आहे ?

दोघाना दिसणारी ती बाई सई ताम्हणकरच आहे का ? ( मला नव्या हिरविनि नीट ओळखत नाहीत, आणि तसाही गेट अप भिन्न आहे. कृपया हसु नये)

मूळ कादंबरीत ती आजारी नवर्‍याला हॉस्पिटल मध्ये न्यायला मदत मागायला येते बहुतेक.
नीट आठवत नाही.(फार बोलले तर स्पॉयलर्स येतील, त्यामुळे थांबते.)

दोघाना दिसणारी ती बाई सई ताम्हणकरच आहे का ? ( मला नव्या हिरविनि नीट ओळखत नाहीत,
>>>
सई नवीन आहे?
आजही ती नवीन वाटत असेल तर मानले पाहिजे तिच्या लोणच्यासारखे मुरलेल्या मधाळ सौंदर्याला !.

समांतर सीजन १ हा युएईमधील एका मित्राला बघायचा आहे. पण त्याला तिथे दिसत नाही. गूगल सर्च केले तर डाऊनलोड सुद्धा होत नाही.
कोणाकडे डाऊनलोड केलेले किंवा अशी लिंक जी यूएईमध्ये सुद्धा काम करेल आहे का?

मित्राचे नाव सुद्धा स्वप्निल आहे. प्लीज मदत करा.

पहिला एपिसोड पहिला. सेक्सstarved लोकांना आवडावा. ठेला दिसला की जसे एक कटिंग मारून आपण पुढे जातो,चुंबने त्या लेवेलला आणून ठेवली आहेत. सर्दी झाल्यावर सारखे नाक शिंकरतो तसे.उत्कट क्षणी घेतलेल्या चुंबनांची सर त्याला कशी येणार? ते सोडून द्या हो. पण एका सीन मध्ये तो आणि बाविसकर भसा भसा सिगारेट ओढताना दाखवले आहेत. हे टाळता आले असते तर बर झाल असत.

समांतर सीजन १ हा युएईमधील एका मित्राला बघायचा आहे. पण त्याला तिथे दिसत नाही. >>> इथे ज्या डिव्हाईस वर दिसतेय ते पाठवून द्या त्याला. किंवा पीसीवर सुरू ठेवून व्हिडीओ कॉल वर दाखवा.

Pages