COVID19 च्या नावानं शिमगा

Submitted by अनन्त्_यात्री on 10 March, 2020 - 06:44

आयनाच्या बायना
करोना काय जायना

कायप्पाच्या
भात्यातले
रामबाणबी चालंना

लसूण ठेचली
कापूर जाळला
गोमूत्रानंबी हटंना

एक एक करत
देश गिळतोय
तोडगा काय सापडंना

वेट मार्केटी
जलमला ह्यो
शेअर मार्केटला सोडंना

चिनी माल
तकलादू पन
ह्यो माल तुटता तुटंना

आयनाच्या बायना
करोना काय जायना

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

>चिनी माल
तकलादू पन
ह्यो माल तुटता तुटंना>>> LOL