तिचं जन्माला येणच चुकत असावं

Submitted by विधीग्रज on 7 March, 2020 - 14:19

तिचं अस्तित्वच जगाला खुपत असावं
बहुधा तिचं जन्माला येणच चुकत असावं
पहिला वार तर उदरातच होतो
जन्माला येण्या आधीच तिचा गर्भपात होतो
जरी वाचलीच त्यातून ती,
तर दुय्यम म्हणून जगावं लागतं
कुणास ठाऊक कोणत्या पापाचं फळ तिला भोगावं लागतं
पुढं
सारं जग तिच्या तारूण्यावर भाळतं
त्याची होत नाही म्हटलं की तिला जिवंतच जाळतं
नंतर
कधी एकटी दिसली की, लांडग्यांसारखे तुटून पडतात
शरिर तर उपभोगतात तिचं नंतर तिची विटंबनाही करतात
हे सगळं पाहून समाज फक्त मेणबत्त्या जाळतो
काय माहित पुढे तिला न्याय केंव्हा मिळतो
म्हणून वाटतं
"तिचं अस्तित्वच जगाला खुपत असावं
बहुधा तिचं जन्माला येणच चुकत असावं "

कवि -
ऋषीकेश सातपुते -पाटील

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कविता चांगली आहे. जमलं तर admin ला विपु करून ग्रुप बदलून कविता करण्याची सूचना द्या.

दाहक! +१
ही कविता या आधी वाचली आहे. इथेच का दुसरीकडे हे आठवत नाही.