बदल गेला तो काळ

Submitted by Swamini Chougule on 2 March, 2020 - 13:24

बदलत गेला तो काळ
आता ज्याचे त्याचे डोके
मोबाईल नावाच्या खोक्यात
प्रत्येक जण रममाण आभासी जगात

बदल गेला तो काळ
जेंव्हा रंगत होते गप्पांचे फड
ज्याला त्याला होती एकमेकांची ओढ
रात्र रात्र रंगायच्या गाण्याच्या मैफिली
मलाच कशी येतात गाणी प्रेमळ चढाओढ लागलेली

बदलत गेला तो काळ
हाय हॉलोची फॉर्मेलिटी
आता नुसती उरलेली
नात्यातील गोडी कुठे तरी विरलेली

बदलत गेला तो काळ
आता नुसती उरली नात्यांची लेबले
लॉंग डिस्टन्सच्या नावाखाली
इमोजी सजलेले
©swamini chougule
बदलत गेला तो काळ
आता नात्यांची गणिते
फेसबुकवर ठरतात
तू का लाईन नाही केलं म्हणून भांडतात

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.