जुने मराठी साहित्य आंंतरजालावर का उपलब्ध नाही...?

Submitted by शुभम् on 24 February, 2020 - 21:38

भारतीय कॉपीराइट कायद्यानुसार लेखकाच्या मृत्यूनंतर साठ वर्षांनी ते साहित्य पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध होत असेल तर 1960 किंवा त्याअगोदर मृत्यू पावलेल्या लेखकांचे ( ठराविक लेखक वगळता , जसे साने गुरुजी , महात्मा गांधी , ) साहित्य इंटरनेट वरती का उपलब्ध नाही....?
नाथमाधव , दातारशास्त्री यांसारखे ...
असेल तर कुठे ....?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्याला माहीत नाही का? असं साहित्य आंतरजालावर उपलब्ध आहे. मला लिंक देता येत नाहीये. पण ई पुस्तकालय साइट हे एक उदाहरण आहे.

साहित्य केवळ जुने आणि प्रताधिकार मुक्त झाले की इंटरनेटवर उपलब्ध व्हावे अशी अपेक्षा आपण का बाळगावी?
साहित्य केवळ जुने आणि प्रताधिकार मुक्त झाले की इंटरनेटवर आपोआप जाऊन पडत नाही.
माझ्या माहिती प्रमाणे तुम्ही लिहिलेल्या साने गुरुजी, महात्मा गांधींबरोबरच सावरकरांचे ही साहित्य उपलब्ध आहे. त्यामुळे असे वाटते की ज्यांचे चाहते / अनुयायी आपापल्या आवडत्या लेखकाच्या साहित्याचा / विचारांचा प्रसार व्हावा म्हणून स्वतः विनामोबदला काम करायला तयार होत असतील / पैसे देऊन असे काम करवून घेत असतील, त्यांचे(च) साहित्य उपलब्ध होत असावे. बाकीच्या लेखकांचे साहित्य आंतर्जालावर आणण्याकरता लागणारा वेळ पैसा उर्जा हे खर्च करायची तयारी कोणी आणि का दाखवावी असा प्रश्न उद्भवतो