कडक!

Submitted by अज्ञातवासी on 24 February, 2020 - 10:46

कडक एकदम! ती खूप सुंदर होती, खूप सुंदर.
मी झोपडीतून बाहेर पडलो.
पावसाळी रात्र होती. बाहेर लै पाऊस पडत होता.
ती प्रेमाने म्हणाली,
"जाऊ नका राया, पडते मी पाया, माझी ही कोमल काया, करा ना तुम्ही माया."
मी तरातरा चालत नाक्यावर गेलो.
पपलूशेठची पोरं दबा धरूनच बसली होती.
सालं, नशीबच खोटं...
मी धावलो, धावतच राहिलो. तेवढ्यात एका बिल्डिंगमध्ये घुसलो.
नक्षीदार बांधकाम होतं, जवान पोरपोरी हातात ग्लास घेऊन नाचत होती.
"कोणी हवंय का तुम्हाला?" एक मंजुळ स्वर घुमला, आणि ती डोळा मारत म्हणाली.
भारीच आयटम होती ती.
"हे आपलं..." मी म्हणालो. माझे शब्द हवेतच विरले.
ती गोड हसली. "ड्रिंक्स घेणार?"
"व्हाय नॉट?" मीही इंग्लिश.
आपण भरपूर प्यालो.
त्यानंतर तिने मला एका उंची खोलीत नेलं. जागोजागी अत्तरे, उंची पडदे, मखमली गालिचा, सजवलेली पुष्पशय्या.
च्यायला, हे सगळं माझ्यासाठी?
"पपलूशेठ, नाव ऐकलय का?"
मी चमकलो, आपला नंबर एक दुष्मन, त्याच ही का नाव घेतेय?
"त्याच्यासाठी आहे तयारी, टपकवशील त्याला?"
"व्हाय नॉट."
आपण खोलीच्या कोपऱ्यात लपलो. तिने जाडजूड गन सायलेन्सर लावून मला दिली.
पपलू शेठ आला. साल्याची मोठी ढेरी लोंबत होती. वर टक्कल, जाड चष्मा, पपलू.
त्याच्यासमोर ती हिरोईन, आयला, काय नशीब एकेकाच!
ती खाली झोपली, पपलूशेठ तिच्यावर आडवा होणार तेवढ्यात...
दोन गोळ्या... पपलूशेठ जागीच कोसळला.
नंबर वन दुष्मन माझा, इतका सहज गेला?
ती उठली, कपडे नीटनेटके केले.
"ड्रिंक्स घेणार?" तिने विचारलं
"व्हाय नॉट?"
आम्ही दोघे आधीच्याच खोलीत गेलो, आणि भरपूर प्यालो.
"कोणी हवंय का तुम्हाला?" ती डोळा मारत म्हणाली.
मी खुशीतच बाहेर आलो. जवान पोरपोरी हातात दारूचा ग्लास घेऊन नाचत होती.
पपलूशेठ संपला होता. पण नाक्यावर मला त्याची सगळी पोरं उभी दिसली, सावजाची वाट बघत.
मी तरातरा चालू लागलो, त्यांची नजर चुकवून झोपडीजवळ पोहोचलो.
ती बाहेरच होती.
"करा ना तुम्ही माया, माझी ही कोमल काया, पडते मी पाया, जाऊ नका राया..."
ती प्रेमाने म्हणाली.
बाहेर लै पाऊस सुरू झाला, रात्र पावसाळी झाली.
मी झोपडीत शिरलो.
सुंदर खूप, होती सुंदर खूप ती, एकदम कडक!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

महाश्वेता ताईंचीच आठवण झाली.>>> मला पण. अज्ञातवासी तुम्हाला काही लॉगीन प्रॉब्लेम आला तर निःसंकोचपणे आम्हाला सांगा. आम्ही पोस्ट करू तो मेसेज. तुमचं नाव लिहू मेसेजच्या वर बरं का.

अजिंक्यराव पाटील लिंक द्याल का?
प्रकाश कर्णिक यांची कथा शोधतोय.

आता कथा उलगडून सांगतो.
इंग्रजीत एक संकल्पना आहे, palindrome नावाची. तो शब्द कुठूनही वाचला, तरी सारखाच वाटतो. तशीच ही कथा, अर्थात संकल्पना जमली, पण वर्ड टू वर्ड नाही.

अजिंक्यराव, जव्हेरगंज यांची ही कथा मी वाचलीये, आणि मलातरी काही साम्य जाणवत नाहीये, आणि तुम्ही सेम स्टोरी म्हणताय, तेही फक्त नाव आणि संवाद बदलून? (ही कथा माझ्या कथेपेक्ष्या कितीतरी उजवी आहे.)
रिप्ले भारी आहे, त्या कथेत आणि या कथेत साम्य जाणवत.

आणि हि जवळपास पूर्ण सिरीज, ह्याच संकल्पनेवर बेतलेली. (आधीच्या कथांमध्ये रिप्ले आपोआप लागतो, इथे तो नायकाच्या हातात आहे.)
http://www.misalpav.com/node/38448

तुमचा अपमान करण्याचा किंवा तुम्ही कॉपी केली असं दाखवण्याचा माझा हेतू नव्हता, पण जे आहे ते सांगितलं. अनेक दिवसात मायबोलीवर फार वेळ नव्हतो म्हणून लिंक द्यायची राहिली होती.

इन्फिनिटी पुन्हा वाचा. पटकन कळत नाहीत जव्हेगंजांच्या कथा.. साम्य आहेच. "what the hell?" पासून लूप लागतोय बघा. असो...

फार मनावर घेऊ नका. महाभारतावर बेस्ड अनेक पुस्तके आली. तसं समजता येईल.

अजिंक्यराव, डोन्ट वरी, माझ्या प्रत्येक कथेवर काही नाचे उलथत असतात, पण त्यांना रिप्लाय देण्याचे कष्ट मी घेत नाही. पण जेव्हा तुमच्यासारखा सेन्सिबल आयडी जेव्हा नावे आणि संवाद बदलून सेम कथा म्हणतो, तेव्हा राहवत नाही. वाङ्मयचौर्य ही फार मोठी गोष्ट आहे, त्यामुळे असं कुणी म्हटलं तर त्या विधानाचा सोक्षमोक्ष लावावाच लागतो (ही स्टेटमेंट व्यक्तीसापेक्ष आहे).
माझी कथा लुपवर बेतलेली नसून सरळ आहे, किंबहुना palindrome वर आहे. इथे कुठलाही लूप फॉर्म होत नाही. तरीही...
साम्य असणं आणि फक्त नावे आणि संवाद बदलून सारखी असणं यात फार मोठा फरक आहे.
महाभारताचं उदाहरण मुळात इथे गैरलागू आहे, कारण त्या उदाहरणाने मी जव्हेरगंज यांची मूळ कथा माझ्या व्हर्जनमध्ये लिहिलीये असाच त्याचा अर्थ होतो.

अजिंक्यराव सोडून द्या. तो दुसर्यांना नाचा बोलत असतो कारण तो स्वतः सेक्रेड गेममधला कुक्कु आहे. मी त्याच्या नारायण धारप धाग्यावर सिद्ध केलंय, स्क्रीनशॉट टाकलाय पहिल्याच पानावर. या आयडीने बायकांचे अनेक डू आयडी काढलेत आणि त्या आयडीने तो स्वतःच्या लेखावर चांगल्या प्रतिक्रिया देत असतो. तुम्ही त्याच्या मनासारखी कमेंट दिली नाहीत तर तो त्या स्त्रियांच्या डुआयडीने आपल्यावर हल्ला चढवतो.

सप्रस एकदम बरोबर आहेत. दुसऱ्यांना नाच्या म्हणणारा बायल्या आता महाश्वेता आयडी कुठं उलथला आहे हे सांग. बायकांचे आयडी घेऊन काय नाटकं केलीस ते माबोकरांना माहिती आहे. मायबोली सोडून जातो म्हणत इथंच कडमडतंय सालं हरामी.