बीएस सहा विषयी

Submitted by आर्यन वाळुंज on 23 February, 2020 - 11:27

एक एप्रिलपासून बीएस सहा मानक असणाऱ्या वाहनांना परवानगी असेल आणि बीएस चार भंगार मध्ये काढावे लागेल अशी चर्चा ऐकत आहे.
तर बीएस सहा मानक फक्त मोठ्या शहरांमध्ये लागू होणार आहे की संपूर्ण भारतात? अजूनही आमच्या कडे ऐंशी पासून ची वाहनं काळाकुट्ट धूर सोडत फिरत असतात. त्यांचे काहीच वाकडं कोण करत नाही. सगळ्यात जास्त राग बजाजचा येतो. त्या खटमाळ्या, टरमाळ्या टू स्ट्रोक इंजिन रिक्षा भकाभक धूर सोडत फिरत आहेत. अक्षरशः जीव गुदमरतो त्यांच्या मागे वाहन चालवताना.
प्रदुषण काही मुंबई, पुणे दिल्ली येथेच नाही. तालुका ठिकाणी सुध्दा खूप प्रदुषण वाढत आहे.
मला माझी बीएस चार मानक असलेली कार एक एप्रिल नंतर वापरता येईल का? कृपया योग्य मार्गदर्शन करा माबोकरांनो.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Happy

Pages