पटरी-२

Submitted by x man on 17 February, 2020 - 02:41

गाडी भरधाव वेगाने हास्पिटल कडे निघाली. ती काळ्या काचांची scorpio होती.

कधी कधी आपला मेंदू इतक्या जलद गतीने काम करतो की काही कालावधी नंतर घडलेली घटना समजून येते. अगदी सेंकदाच्या हजारव्या भागात निर्णय घेतले जातात. असे निर्णय की ज्यांचा परिणाम आपल्याला आयुष्यभर भोगायला लागनार असतात. त्यावेळीही असाच एक निर्णय घेतला गेला...

शिवाजी चौकाच्या डावीकडे हास्पिटलला जाणारा रस्ता तर उजवीकडे वखार महामंड्ळाची उंच भिंत असलेला रस्ता होता.

" लेफ़्ट में "ड्रायव्हरचा खांदा धरून मी ओरडलो

त्याचा उजवा हात अचानक डाव्या बाजूला कमरेच्या वर गेला त्याने तो झटकन खाली घेतला. मी समजायचं ते समजलो. त्याने माझ्याकडे रिअर मिरर मधे बघितले. आमची नजरा नजर झाली.

त्यानी झटकन क्लच व ब्रेक दाबून गाडी बाजूला घेतली व आत्मविश्वासपुर्ण नजरेने रिअर मिरर मधे बघितले.

हाच तो क्षण , मला कळाले मी झटकन पिस्तूल काढून त्याच्या मानेवर गोळी घातली. त्याचा उअजवा हात कमरेच्या पिस्तुलावरच राहीला व नंतर गळून पडला.
मी त्याला बाजूच्या सिटच्या पुढील जागेत झोपवला. ड्रायव्हिंग सीटवर बसलो. त्याच रस्या्ने वेगात गाडी पुधे का्ढली. कल्याण्च्या बाहेत एक नदीचा पूल ला्गतो त्या पूलाच्या खाली नदीपर्यंत जायला वाट आहे. मी गाडी थेट पुलाखाली नदी पात्रात घातली
.
माझा मेंदू आता अत्यंत जलद गतीने माहितीचे processing करत होता. मी सर्व ताकद लावून ड्रायव्हरला बाहेर काढला. तो मेलाय की जिवंत हे पहायला मला वेळ नव्हता. मी लगेच बाजूला पडलेला मोठा दगड उचलून त्याच्या डोक्यात घातला. एकदा, दोनदा.. काय माहित किती वेळा

माझ्या सर्व शरीरातून घामाच्या धारा वाहत होत्या. शर्ट पाठीला चिकटला होता. मी पुन्हा सर्व ताकद लावून बार मालकाला बाहेर काढले. त्याच्यापण डोक्यात घालण्यासाठी दगड वर उचलला. पण त्याच ्वेळी त्याला शुध्द आली.

"प्लीज, नहीं .. प्लीज" तो कण्हत होता.

मला दया आली. मी दगड बाजूला फ़ेकून दिला व त्याला तसेच सोडून निघालो.

तोच माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. मला त्या मानसाचे शब्द आठवले.

तु एका माणसाच्या डोक्यात गोळी घा्ल

मी झटकन वळालो. धावत ड्रायव्हरच्या कमरेचे पिस्तूल काढून दोन गोळ्या बार मालकाच्या डोक्यात घातल्या. ड्रायव्हरला माझे कपडे घातले. त्याचे कपडे व ती बॅग व बार मालकाचे पिस्तूल घेवून मी पुलाखालून पलीकडच्या कच-याच्या ढिगाकडे निघालो.

रस्तावरील पिवळट दि्व्याचा कवडसा पुलाखाली येत होता. बॅग उघडली. जांभळ्या रंगाच्या दोन हजाराच्या नोटा. कचयातील एक पिशवी काढून त्यात कचरा व सर्व सामान पैशासकट टाकले. कपडे काढले . नदीपात्रातील वाळू, माती अंगावर, चेह-याला लावली.

आता मी कचरा गोळा करणारा वाटत होतो. रात्रभर कच-याच्या ढीगात राहिलो. सकाळी उ्ठून पहिल्या लोकलने बदलापूरला निघालो. नवीन कपडे घा्लून डायरेक्ट घरी गेलो.

हातभर फ़ाटली होती. पुढचे तीन दिवस घरा बाहे्र पडलो नाही.

"बार मालकाचा व एका अज्ञात ईसमाचा खून करून ड्रायव्हर फ़रार " झी न्यूज

पैशांचा उल्लेख कुठेच नव्ह्ता. मी खुष झालो. पैसे मोजले. चार कोटी होते.

मी निश्चिंत झालो आता माझी सर्व स्वप्ने पूर्ण होणार होती.

दुपारची झोप पक्याच्या फ़ोनने मोडली. पक्या हा माझ्याबरोबर कामाला होता. मध्येच त्याने नोकरी सोडली माझ्यात एवढा दम नव्हता. आता तो कधी या मोर्च्यात कधी त्या नेत्याकडे असा दिसायचा.
कधी कधी एखादी INVESTMENT स्कीम घेण्या्साथी जाम पकव्वयचा. संध्याकाळी भेटू असे म्हणून त्याला कटवला.

"बहुत माल छाप रहा है आज कल, हां ?" पक्याने सकाळी सरळ स्टेशनवरच गाठले.

माझा चहाचा घोट घश्यात्च अडकला. -म्हणजे?

काय नाय रे, आफ़िस्सतला चन्दु भेटला होता तो बोलला तू चार पाच दिवस आला नाय फ़ोन पण नाय घेत

माझी ट्युब पेटली " तब्येत ठीक नव्हती"

" चल फ़िर , तब्येत ठीक करुन घेवू" पक्या

"कामाचं बोल" मी.

"एक स्कीम आहे . पाच लाख लावायचे, महिन्यात डबल "

" गप च्यु साला"

" अरे एक तर, पावडर घ्यायची पाच लाखाची , महिनाभर ठेवायची , महिन्याने एकाला द्यायची डबल किंमतीत एक सुलेमान आहे तो देतो पावडर पण ओन्ली कॅश "

"पावडर म्हणजे?"

"एम. डी." आम्ही दोघे एकदम बोललो.

"आपल्याला हे लफ़डं नको यार " मी म्हनालो

"अरे का्य नाय होत मी अडीच टाकतो आणि आपण फ़क्त पावडर ठेवायची विकायची नाय "

"बघू" मी सिगारेट पेटवत बोललो.

"उद्या आपण जावू सुलेमान कडे मग, काय? "

मी स्टेशनकडे बघत शांतपणे धूर सोडत राहिलो. स्टेशनवर माझी 8.15 ची लोकल लागली होती. मला बघून हसत होती.

क्रमश:

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

काय माणूस आहे हा!!
स्वतःचीच कबर खोदत चाललाय.
आता मला पुढचे भाग वाचायला भीती वाटतेय.

एवढा जिगरबाज आहे तर स्मशानात जाऊन एखाद्या मुडद्याला डोक्यात गोळी मारता आली असती
स्वामींनी जिवंत माणसाच्या डोक्यात गोळी मारा असं कुठेही सांगितलं नाही.आता बार मालक वाचलेला असेल तो नडेल.