पटरी

Submitted by x man on 15 February, 2020 - 04:29

झोपेतून उठलो , तीच ती भिकार सकाळ, तेच आफ़िस, तेच च्यु काम आणी तोच ्झाट्भर पगार हे सर्व एकदम आठवलं

नशिबाला शिव्या घालत उठलो. आंघोळ वगैरे नेहमीची कामे उरकून त्याच लोकलच्या त्याच ड्ब्याच्या त्याच जागेवर जाउन उभा राहिलो आणि सुरु झाला एक प्रवास.......

एक असा निरस , कंटाळ्वाणा प्रवास ... रोजचा प्रवास

मी गेली आठ वर्ष असाच प्रवास करतोय का? माहित नाही? जगण्यासा्ठी प्ण जे चालु आहे त्याला नक्की जगणं म्हनायचं का? हे ही माहित नाही.

तर असा माझा प्रवास सुरु होता. खरंतर मला ्बिझनेस ची प्रचंड आवड आहे. पण भाडंवल नाही शिवास नोकरी सोडायची भिती त्यामुळे सर्व स्थगित जीवनात सर्व काही अड्कलं आहे असं वाटायचं एखाद्या लाल दिवा लाग्लेल्या सिग्नल प्र्माणे

पण आज तो दिसला मला. तसा तो आता नेहमी दिसायचा समोरच्या लेडीन डब्यात. हो लेडिजच तो पिना वगैरे लेडीज वस्तू विकायचा. तांबट डोळे, भरपू्र दा्ढी , कपाळाला गंध त्याचा आवाज खडा होता.
पिन... कंगवा असा काही हेल लावून बोलायचा की सर्व डबा जागा व्हायचा ईतरही विक्रेते यायचे पण बायका याच्याकडून जास्त घ्यायच्या. माझी व त्याची रोज नजरा नजर व्हायची पण मी काही बोलायचो नाही. तो पण गप्पच. तो सुध्दा वडाळ्यालाच उत्रायचा

आज मी नेहमी प्रमाणे उतरलो तर मागून त्याचा आवाज.
साहेब... घेणार का काही ?

मी हसलो. तुझ्याकडे मला लागणारे काही नाही. काय घेणार?

कधी कधी नको त्या ठिकाणी पाहिजे त्या वस्तू भेटून जातात. साहेब, गालातल्या गालात हसत तो म्हणाला, रोज लोकलने जाता तुमी लोक पण कंदी कोणची पटरी कुठं जाती हे कुणालाच क्ळतं नाही.

आता मी वैतागलो होतो . याच्याकडून्च ्डोस बाकी होता फ़क्त मी म्हणालो मुद्द्याचं बोल

साहेब तुमच्या सारखे रोज पाहतो. ईच्छा असूनही बिझनेस न करता नोकरी करणारे. एक माणूस आहे इथं कल्याण मदी तो जे सांगतो ते करायचं पाहिजे ते भेटतं

हो का ? मग तुला मिळालं वाटतं , मी चिडून बोललो

हो तर पहिले मी पहिले भिक मागायचो आता माझं एक छोटं दुकान सुरु करतोय. यायचं तर या तुमची मर्जी , ्तो हसत म्हणाला

बघू - मी

आफ़िस मधे आज पुन्हा चढाचढी झाली. जाम वैतागलो . संध्याका्ळी तो पुन्हा भेटला.
मी त्याला तयार असल्याचं सागितलं

तो म्हणाला ," चला, पण एक लक्षा्त ठेवा त्या खोलीत आल्यानंतर त्यानी जे सांगितलं ते करावचं लागतंय तुमची मर्जी असो वा नसो "

मी म्हणालो, चल रे बघू

कल्याणच्या एका जुन्या चाळीतील खोलीत आ्म्ही गेलो.
त्या माणसाने मला काय सांगितलं हे एकुन तुम्हाला हसायला येईल
तो म्हणाला ,"तु एका माणसाच्या डोक्यात गोळी घा्ल"

मी तिथेच हसायला लागलो. त्या पिनवाल्याने मला हाताला धरून बाहेर काडलं
"च्युत्या झाला का बे " मी जोरात ओरडलो व मागे वळून न पाहता झपाझप चालू लागलो. स्टेशनला आलो लोकल मधे बसलो रात्रीचे एक वाजले होते. फ़ाल्तु वेळ गेला म्हणून मला फ़ार राग आला होता.
मी टेनमधून उतरलो व सरळ ममता मध्ये गेलो क्वार्टर घेतली. बार मधे फ़क्त दोन जण पीत बसले होते. मी गल्ल्याजवळ बसलो मनातल्या मनात जगाला शिव्या घालत होतो. तर बारच्या आतून मोठा आवाज आला मी झटकन लपलो टेबलाखाली.

बार मधील दोघे मालकाला गोळ्या घालत होते. मालकानेही त्या दोघांना गोळ्या घातल्या. मालक ज्खमी झाला होता. मी हळुच डो्के बाहेर काढले

"दोस्त मुझे अस्पताल ले्के चल तुझे पैसा दुंगा " मालकाला छातीत गो्ळी लागली होती. ईतर सर्व मरुन पडले होते. त्याने एका बॅगेकडे बोट केले.

मी मालकाला बॅगेसहित गाडीत कोंबले ती त्याचीच गाडी होती. त्याच driver चालवू लागला. मी त्याला सिटि हास्पिटलला घ्यायला सांगितले.

मी मागच्या सि्ट वर होतो मालक बेशुध्द होता. अचानक माझे लक्ष गाडीत खाली पडलेल्या चकचकित पिस्टाल कडे गेले.

" धडाम , " तो आवाज गाड्यांच्या वर्दळित विरुन गेला.

क्रमश:

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users