माझी व्हॅलेंटाईन

Submitted by Dr Raju Kasambe on 14 February, 2020 - 03:28

माझी व्हॅलेंटाईन

तुडवत निघालोय मी अनवट रानवाटा
महामार्गावरून वाट माझी जात नाही !

रानोमाळ भटकते मन दिन-रात माझे
गाव, शहर, बंगल्यात मी राहत नाही !

पाना फुलांचे रंग टिपत मी जातो
हिरवा निळा भगवा माझी जात नाही !

अनुभवतो दिवस-रात्र गाणे निसर्गाचे
कोलाहल जगण्याचा आता सहवत नाही !

पुरता भाळलो मी सौंदर्यावर निसर्ग देवीच्या
आणखी आता प्रेयसी मी शोधत नाही !

निसर्ग देवता माझी माता, मैत्रीण, प्रेयसी
व्हॅलेंटाईन डे आता उगाच मनवत नाही !

डॉ. राजू कसंबे
मुंबई

Group content visibility: 
Use group defaults