पावसा कधी रे कळेल तुला

Submitted by वैशाली अ वर्तक on 11 February, 2020 - 23:12

पावसा कधी रे कळेल तुला

पावसा तुजवरी च अवलंबून सारी सृष्टी
तरी का तू न ठेविशी तीजवरी कृपादृष्टी

भ्रमण करिते वसुधा नियमीत नेमाने
म्हणूनच येती जगती ऋतू चक्र क्रमाने

पण पावसा तूच का करितो चुकार पणा
अडूनी रहातो अन् दावितो तुझा मी पणा

न येता वेळेवर करितोस कधी उशीर
पाण्या विना भुकेलेली दिसती शिवार

विना पाणी जीव सृष्टी कशी बहरतील
प्राणी मात्र तुजविण कसे वाचतील

पावसा तू तर कधी अवचित येऊनी
उभ्या पिकाचे जातो नुकसान करुनी

अती वृष्टी करुनी वाहुन नेतो घरदार
करितो जनांना सर्वची परीने बेजार

उभे पीक दाण्या सहित पाहून आनंद वाटे
तुझ्या नको तेव्हा येण्याने दुःखची दाटे.

Group content visibility: 
Use group defaults