'मेकअप' चित्रपट

Submitted by सुमेधा आदवडे on 9 February, 2020 - 04:26

मेकअप. केवळ चेहऱ्याचा, शरीराचा नव्हे तर मनाचा, conscience चा, बाहेरूनच नव्हे तर आतून बदलून टाकणारा. तसं बघायला गेलं तर आपण सगळेच रोजच्या आयुष्यात, आयुष्यभर, स्वतःचा, कधी कधी इतरांचाही मेकअप करत असतो. उद्देश काय? सुंदर करायचं. जसं शरीराला तसं मनालाही. मग तो मुखवटा असो, की माणसाचं खरं मन, खरा स्वभाव मेकअप मुळे उभारून आलेला असो. पण सुंदर असतो.
चित्रपटाच्या सुरुवातीलाच रिंकू राजगुरूचा खट्याळ, मस्तीखोर स्वभाव कळतो. रिंकू खूप छान अभिनेत्री आहे. तिला असे bubbly मुलीचे रोल्स फार शोभतात. मग ती जो चिन्मय उदगिरकर मध्ये बदल घडवून आणते, त्याचा इंटरवलच्या आधी जो मेकअप करते तो पाहण्यासारखा आहे. चिन्मयही उत्तम अभिनेता. आधीचा शांत आणि नंतरचा खोडकर, खट्याळ भूमिका सगळंच छान निभावलंय त्याने. राजन ताम्हाणे, सुमुखी पेंडसे, प्रतीक्षा लोणकर सर्वांच्या भूमिका छान.

तेजपाल वाघ ने एक खूप नॅचरल भाऊ साकारला आहे. चित्रपटात त्याचा मध्ये मध्ये राग ही येतो. पण त्याच्या दृष्टीने ते वागणं बरोबरही वाटतं. त्याचाही नंतर झालेला मेकअप मस्त! शिवाय रिंकूच्या आजीची भूमिकाही वाखाणण्याजोगी.

चित्रपटाचे दिग्दर्शन गणेश पंडित याने केलं आहे तर पटकथा आणि संवादांचे वल्लरी चवाथे हिने सह लेखन आहे. दोन्ही अगदी कंमेंडबेल! त्यात अजिबात रटाळपणा नाही, तर एक फ्रेशनेस आहे. म्हणजे हॉस्पिटल सारख्या सिरीयस सीन्स साठी सुद्धा संवदामध्ये ह्युमर साधलाय, आणि उत्तम जमलाय तो. हा संवादांचा किंवा संवादामधला मेकअपही चित्रपटाच्या नावाला जागलाय असं लक्षात येतं.
इंटरवलला एक झटका आणि शेवटी एक. तुम्ही विचार करत रहाल, सिनेमा आता असं वळण घेईल, पण तसं काही होणार नाही. चित्रपट अजिबात predictable नाही आणि मला वाटतं ह्यात खूप मोठं यश आहे दिग्दर्शकाचं आणि पूर्ण टीमचं.

त्यासोबत चांगल्या गाण्यांची आणि उत्तम प्लेबॅक ची साथ ही चित्रपटाला मिळालेली आहे. आधीच प्रेक्षकांच्या प्रचंड प्रसिद्धीचं बॅगेज असलेली चाल असली तरी 'करार प्रेमाचे' ह्या गाण्याची धुरा नेहा कक्करने खूप छान सांभाळली आहे.
असे चित्रपट पुन्हा पुन्हा आणि खूप बनत नाहीत, बनले तरी इतके छान होत नाहीत. नक्की पहा... मेकअप.

-सुमेधा आदवडे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान परिक्षण!
वल्लरी, तुझे आणि मेकअप टीमचे अभिनंदन!