प्रभु श्रीराम मंदिर निर्माण

Submitted by आर्यन वाळुंज on 9 February, 2020 - 02:02

अयोध्येत श्रीराम जन्मभूमीचा वाद अखेर न्यायालयाच्या निकालाने संपुष्टात आला आहे. जन्मस्थानावर श्रीराम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आणि ट्रस्ट स्थापून पुढच्या
कार्यवाहीला सुरुवात झाली आहे.
मी मंदिर निर्माणासाठी माझा खारीचा वाटा म्हणून पाच हजार रुपये ट्रस्ट कडे जमा करु इच्छितो. कुणाला पैसे कुठे जमा करायचे हे माहिती असेल तर इथे लिहा.
सर्व मायबोलीकर हिंदू बांधवांनी राममंदिर उभारण्यासाठी आपापल्या इच्छा आणि शक्तीप्रमाणं मदत करावी अशी माझी नम्र विनंती आहे.
ज्यांचा विरोध असेल त्यांनी मदत करु नये आणि फालतू प्रतिसाद देऊ नये ही नम्र विनंती. सूज्ञांस अधिक सांगणे न लगे. धन्यवाद!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

व्हॉटसपग्रूप तयार करून एकत्रित मदत करू शकता.
दुर्दैवाने सध्या माझा एक कॉलेजमित्र आणि एक जुन्या ऑफिसातील हेडशिपाई हे दोघे हॉस्पिटलमध्ये मृत्युशी झुंजत आहेत. त्यांना मदतनिधी गोळा करायला आम्ही व्हॉटसपग्रूप बनवलेत. आणि पैसे गोळा करतोय.
त्यातल्या कॉलेजमित्रासाठी एक इम्पॅक्टगुरू या साईटवर फन्ड जमा करायला एक अकाऊण्ट उघडलेय. मला नक्की काय असते याची आयड्या नाही. पण तुमच्या केसमध्येही तसे काही करता येईल का याचा शोध घ्या.
शुभेच्छा Happy

खालील लिंकवर चेक करू शकता

https://www.impactguru.com/fundraiser/help-surendra-gawas?utm_source=fac...

ब्लॅककॅट मला माहित आहे तू हिन्दू धर्म सोडून दुसऱ्या धर्मात गेलेला आहे. तरी सुचना करूनही फालतू कमेंट करत आहे यात तूझी चूक नाही. तूझ्या आई-वडिलांना चांगले संस्कार मिळाले नसणार, सो ते तूला कुठून मिळणार? चालू दे.

तुमची मदत करण्याचा हेतू होता, यात फालतू काही नाही , जेंव्हा ऑफिशियल ट्रस्ट स्थापन होईल , तेंव्हाच तुम्ही ते सोपवू शकाल ना?
तोवर लोकल लेव्हलला गट करून तुम्ही साठवू शकाल.

कोरावर पण हेच उत्तर आहे

https://www.quora.com/How-do-I-donate-for-the-Ayodhya-Ram-Mandir-constru...

गुगल करूनही अजून कोणते बॅंक अकाउंट दिसत नाही

मग <अजून ट्रस्ट स्थापन झाला नाही >
एवढेच का लिहिले नाही. पुढचं दळण दळायची काय काय गरज होती. माझ्या पैशांना व्याज मिळणं सुरुच आहे म्हटलं.

पुढचं दळण दळायची काय काय गरज होती. <<<

कुठेही काहीही काय विचारता?

इथे पुढचे दळण दळायची मुभा आहे यामुळे कित्येकांचे अनाकलनीय एकाकीपण (त्यांच्यासाठी) सुखदरीत्या नष्ट झाले आहे.

बाकी तेथे राम मंदिर बनते की इतर काही यामुळे मला काही फरक पडत नाही हेही लिहितो. नाहीतर अवांतर प्रतिसाद दिला गेला असे समजून प्रतिसादच उडायचा.

मी राम, कृष्ण, अल्लाह, येशू व इतर यांच्याप्रती त्यांच्या त्यांच्या अनुयायांच्या मनात असलेल्या निस्सीम भक्तीभावाला आदरणीय मानतो कारण तो त्यांना व्यक्तिगत जीवनात सहाय्यकारक ठरत असावा असे मी गृहीत धरतो. मात्र त्यामुळे वर्तन अमानवीय होत असेल तर त्याचा मी तीव्र विरोध करतो.

<< मी राम, कृष्ण, अल्लाह, येशू व इतर यांच्याप्रती त्यांच्या त्यांच्या अनुयायांच्या मनात असलेल्या निस्सीम भक्तीभावाला आदरणीय मानतो कारण तो त्यांना व्यक्तिगत जीवनात सहाय्यकारक ठरत असावा असे मी गृहीत धरतो. मात्र त्यामुळे वर्तन अमानवीय होत असेल तर त्याचा मी तीव्र विरोध करतो. >>

------ सर्वांनीच Happy आचरणात आणावे असे विचार आहेत, आवडलेत.

९२ सालीच आमच्याकडुन पैसे घेऊन गेले होते. आता त्याचं अगडबंब व्याज झालं असावं. पैसे घेऊन गेलेले काका रामाघरी पण पोचले. त्यामुळे पैसे कुठे गेले ठाऊक नाही

तुम्ही जावा की रामाघरी. काका बी भेटतील. पैसे परत नाही मिळाले तर मुक्ती नाय मिळायची तुमच्या सारख्यांना.
तसंबी एकदा दिलेल्या देणगीचा जास्त विचार करू नये.

मंदिराला सध्या पैशापेक्षा कारागिरांची जास्त गरज आहे.

https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/ayodhya-vhp-design-is...

विश्व हिंदू परिषदेच्या मंदिर निर्मिती कार्यशाळेशी संबंधित पर्यवेक्षकाच्या म्हणण्यानुसार, 'या क्षणी या कार्यशाळेत कुणीही शिल्पकार नाही. रजनीकांत सोमपुरांच्या नेतृत्वाखाली येथे मंदिर उभारणीसाठी शिळांवर नक्षीकाम करण्यात येत होते. मात्र, सोमपुरा यांचे याचवर्षी जुलैमध्ये निधन झाले. विश्व हिंदू परिषदेच्या या कार्यशाळेत १९९० पासून मंदिरासाठी काम सुरू होतं.' गेल्या तीन दशकांपासून या ठिकाणी दररोज आठ तास शिळांवर नक्षीकाम करण्यात येत आहे. मात्र, आतापर्यंत झालेलं काम हे मंदिराचे निम्मे बांधकाम होईल इतकेच आहे. याचाच अर्थ २१२ खांबांच्या (पिलर) या मंदिराचे १०६ खांब तयार आहेत. 'मंदिर निर्मितीसाठीच्या कार्यशाळेत सध्या कुणीही कारागीर उपलब्ध नाही. जर या ठिकाणी काम पुन्हा सुरू करायचे असेल तर आम्हाला किमान २५० विशेषज्ज्ञ कारागीरांची गरज लागेल आणि मंदिर निर्मितीसाठी त्यांना किमान पाच वर्षांचा अवधी द्यावा लागेल,' असं राम मंदिर निर्मितीच्या कामाची देखरेख करणारे अन्नुभाई सोमपुरा यांनी सांगितलं.

blackcat त्या अडीच का पाच एकर दान दिलेल्या जमिनीचं काही कराताय की नाही? जास्त दिवस पड राहू देऊ नका, नाहीतर गरीब हिंदूंनी त्यावर चाळी बांधल्या तर तुम्हा लोकांची पंचाईत व्हायची.

>>> ९२ सालीच आमच्याकडुन पैसे घेऊन गेले होते. आता त्याचं अगडबंब व्याज झालं असावं. पैसे घेऊन गेलेले काका रामाघरी पण पोचले. त्यामुळे पैसे कुठे गेले ठाऊक नाही >>>

च्यायला, देणार २-४ आणे आणि करणार अगडबंब व्याजाच्या गफ्फा.

फुरोगाम्या , आम्ही दिलेल्या दानावरच मंदीर बांधताय ना?? तु काय तुझ्या पिताश्री<ची करोडोअची जायदाद दिलीस का रे देवळासठी?

https://www.loksatta.com/desh-videsh-news/nritya-gopal-das-is-elected-as...

या पहिल्या बैठकीत मंदिराचे बांधकाम कधीपासून सुरू करायचे आहे? याबाबत झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. तर पुढील बैठक अयोध्येत होणार असुन त्या बैठकीत मंदिर उभारणीच्या कामाची तारीख निश्चित होणार असल्याची शक्यता आहे. या पहिल्या बैठकीस एकुण १४ ट्रस्टी उपस्थित होते. अयोध्येतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत ट्रस्टचे खाते उघडण्याचेही ठरले असल्याची माहिती आहे.

धन्यवाद काळबोकोबा. पेन्शन व पगार वाढ मिळत नाही म्हणून तू काम न करता केवळ इकडे टैमपास करत असतोस. तू मंदिर बांधकामासाठी वर्गणी, देणगी देऊ नकोस. चिवट सारखा पैसा गेला म्हणून रडत बसशील.

>>> फुरोगाम्या , आम्ही दिलेल्या दानावरच मंदीर बांधताय ना?? तु काय तुझ्या पिताश्री<ची करोडोअची जायदाद दिलीस का रे देवळासठी? >>>

अरे भिकाऱ्या, तू कोठून दान देणार? मंदीर निर्माण झाले की तिथे जाऊन भीक मागत बसशील.

गुड blackcat,. अशाच प्रकारे मंदिराचे अपडेट्स इथे टाकत जा. निदान रोज एक तरी प्रतिसाद झालाच पाहिजे. प्रभू श्रीराम यांचे नामस्मरण तुझी बुडती नौका पार करेल. मंदिर पूर्ण झाल्यावर प्रभू श्रीरामांच्या चरणी तू डोके टेकवलेस की त्या नामस्मरणाचे चीज झाल्याची अनुभूती तुला येईल....

त्याचसोबत बाबरीच्या पर्यायी जागेवर जे युनानी इस्पितळ बांधणार आहेत त्यात तुला काम मिळावे यासाठी प्रयत्न कर, म्हणजे रोज किमान पाच वेळा भक्तिभावाने श्रीरामांचे दर्शन तुला घेता येईल.

चिवट मित्रा एव्हढा राग कामाचा नाही, उगाच रक्तदाब वाढवून घेऊ नकोस. त्यापेक्षा तू नवीन बांधल्या जाणाऱ्या बाबर इस्पितळा साठी पैसे दे. मग परफेक्ट संतुलन साधले जाईल. जय श्रीराम !

Pages