नित्यानंद अणि नामस्मरणाचा रोग

Submitted by Silent Banker on 7 February, 2020 - 12:42

गेल्या दोन -तीन आठवड्यामध्ये कुठल्याही संवेदनशील माणसाच्या काळजाचा ठोका चुकविणाऱ्या घटना घडल्या। एक होती हैदराबाद मध्ये झालेल्या डॉक्टर तरुणीच्या बलात्कार अणि हत्येची। महिला सबलीकरणाच्या काळात अशा घटना चीड़ निर्माण करतात अणि त्यामुळे साहजिकच हैदराबाद पोलिसांनी ज्या तत्परतेने आरोपींचे एनकाउंटर( मानवाधिकार वैगरे आचरट कल्पनांना भीक न घालता) केले ते निश्चितच कौतुकास्पद। दूसरी अणि तितकीच महत्वाची बातमी म्हणजे " ए राजशेखरन " या नावाच्या माणसाने इक्वाडोर किंवा केमन आइलैंड च्या दरम्यान असलेले एक बेट (island ) विकत घेऊन स्थापन केलेला छोटा देश (micronation ) म्हणजेच "कैलास ". ज्याला स्व:तचे मंत्रिमंडळ (कॅबिनेट ) , पंतप्रधान आहे अणि या राष्ट्राचा स्व:तचा ध्वज असून जगातील सर्व हिंदू लोकांसाठी (जाती पाती विरहित ) ज्यांचा धार्मिक आस्था विशिष्ट असल्यामुळे जगभरात छळ (percecuated) होतो आहे त्यांना सुखाने आपल्या धर्माचे पालन करता यावे म्हणून स्व:तला शिवभक्त (shaivite ) म्हणवणाऱ्या लोकांनी चालू केलेले राष्ट्र। "

भारत हा देश सेक्युलरच (?) आहे की त्याची वाटचाल हिन्दू राष्ट्राच्या मार्गाने चालली आहे यावर प्राइम टाइम चर्चा झड़त असताना जगात निर्माण झालेले हे पहिलेच छोटे हिन्दू राष्ट्र(micronation )। ज्या Citizen Amendment Bill " च्या माध्यमातून भारत सरकार शेजारी देशातील माइनॉरिटीला सामावून घेण्यासाठी असेच काहीसे करू इच्छित आहे, तसाच हा प्रकार। आता तुम्ही म्हणाल या दुसऱ्या बातमीचा पहिल्या हैदराबादवाल्या बातमीशी काय संबंध।

निश्चितच आहे तो असा :

"ए राजशेखरन" हा ४२ वर्षीय माणूस दूसरा तिसरा कोणी नसून बलात्कार अणि लहान मुलांचे शोषण अशा गंभीर गुन्हांमध्ये अटक वारंट असलेला "स्वामी नित्यानंद ". 'नित्यानंद ध्यानपीठ' च्या नावाखाली आपले धार्मिक दूकान थाटलेला स्व:तला शिवभक्त वैगरे म्हणवणारा श्रीमंत भोगी। यातील गंमत पहा ज्या शिवभक्तीच्या नावाने याने आपले दूकान थाटले अणि जो मूळचा कैलासवासी ( Original Kailasaite ) आहे तो शंकर सुखी स्थिर सांसारिक जीवनपेक्षा भणंगपणताच (Wanderer's Life ) रमणारा व खऱ्या अर्थाने " विध्वंस अणि निर्मिति " च्या खेळाचा सूत्रधार। त्याचा हा तथाकथिक भक्त म्हणजे योग्याच्या वेशातील राक्षसच। त्याची प्रवचने म्हणजे आचरट पणाचा कळसच। तर काय म्हणे याच्या कड़े एवढी आध्यात्मिक शक्ती आहे की तो " सूर्योदय ४० मिनिटे उशिरा करू शकतो " किंवा " गाय किंवा इतर पशुंना संस्कृत अणि तमिळ मध्ये बोलायला लावू शकतो " किंवा " त्याच्या ८२ (अंध)भक्तांना त्याने तिसरा डोळा उघडून जग दाखविले ". या सर्वांवर कड़ी म्हणजे नोबल पारितोषिक विजेता Einstein कसा चूक आहे आणि physics हा विषय त्याला कसा कळला नाही यावरचे विवेचन।

आता तुम्ही म्हणाल असल्या वेड्याच्या मागे कोण लागेल , तर तो तुमचा गैरसमज ठरेल। सामान्य गरजू लोकांपासून ते सिनेअभिनेती (Actress ) ,राजकीय पुढाऱ्यांपर्यंत बरेच लोक याचे भक्त। तसे पाहिले तर धार्मिक दुकानदारीचे एक नवे बिज़नेस मॉडेलच अलीकडे तयार झाले आहे। सुरवातीला प्रवचने , जत्रा मेळावे या माध्यमातून साध्या भोळ्या भाबड्या धार्मिक लोकांमध्ये आपले बस्तान बसवायचे। अन्नछत्र , जमलेच तर शाळा , रुग्णवाहिका , हॉस्पिटल्स अशा सामान्य माणसाच्या निकडीच्या सोयीसुविधा अल्पदरात किंवा फुकटात देऊन ते अधिक दॄढ करायचे। एकदा का गर्दी जमायला लागली की तिथे " गर्दी तिथे पुढारी " या न्यायाने नेता नावाची जी जमात आहे ती प्रकट होते , मग त्या परोपकारी (?) लोकप्रिय बाबाला राजाश्रय मिळतो। Glamour च्या जगात असणारी स्पर्धा किंवा relevant राहण्यासाठीची धडपड तिथे काम करणाऱ्या लोकांना सतत तणावाखाली ठेवते , त्यातून येणारी असुरक्षितता , व्यसनाधीनता , एकटेपणा किंवा आपल्या आयुष्याचा 'अर्थच काय' पर्यन्त गेलेली टोकाची निराशा यावर " जीवनाचा खरा अर्थ " समजावून सांगण्याच्या गोंडस नावाखाली नवनवीन आध्यात्मिक गुरुंची गरज पडतेच ,मग लोकाश्रय मिळालेले बाबा लोक ती जागा घेतात अणि सुरु होतो एक पंचतारांकित आध्यात्मिक प्रवास। मग हे लोक देशोदेशींच्या लोकांच्या "Enlightenment " साठी " इंग्लिश "मधून अध्यात्म पाजळतात। त्यांचे हे पंचतारांकित भक्त लोक मदिराक्षीच्या संगतीत बाबा कसे ग्रेट आहेत अणि त्यांनी साध्या भाषेत कसे "Enlight " केले असे "lightening speed " मध्ये बरळतात। याचाच पुढील टप्पा म्हणजे अशा देशी विदेशी भक्तांचे होणारे शोषण , कधी ते भोळ्या भक्तीचे आड़ केले जाते तर कधी "Enlightenment With Master Programme " च्या नावाखाली "Contractual agreement " वैगरे करून रीतसर होते , बर इतर वेळी "Hotel चा Feedback Form " पण कर्तत्व कठोर पणे भरणारा माणूस बाबांवरच्या (अंध)विश्वासपायी काहीही न वाचता तो फॉर्म भरून सही करून मोकळा होतो अणि पश्चतापाच्या बंधनात अडकतो। कधी तो बाबा "आसाराम "असतो , कधी "बाबा राम रहीम " असतो, तर कधी " नित्यानंद "असतो। नावे वेगवेगळी , भक्तीच्या नावाखाली दुकाने चालविण्याचा धंदा सारखाच।

हे सर्व पाहिल्यावर साहजिकच प्रश्न पडतो की पुन्हा पुन्हा फसवणूक होऊन देखील दर खेपेला नव्या बाबाला नमन करण्यासाठी आपण पुढे का असतो याचे सोपे उत्तर म्हणजे "आपला नामस्मरणाचा रोग ". ताणतणाव अणि संकटांनी भरलेल्या आयुष्यात विसाव्यासाठी , आपल्या पाठीमागे कोणी आहे असा विश्वास देणारे कोणी तरी असावे असे वाटणे चुकीचे नक्कीच नाही। "पांडुरंगी दॄढ भावो " या तत्त्वा प्रमाणे तो आधार "देव " नावाच्या संकल्पनेमध्ये पाहणे हे स्वाभाविक आहे , तिथे पोचण्याचा मार्ग म्हणजे भक्ति / नामस्मरण/सेवा इ। Action(कृति ) पेक्षा Attention ( देव पाहून घेईल) वर भरोसा असलेला असा भाबडा भाविक म्हणजे त्या मार्गावरून देवभेटीचा अनुभव किंवा जीवनाचा अर्थ वैगरे समजून देऊ म्हणणाऱ्या बाबा लोकांचा "Target audience " असतो। मग हे भूतलावरील देव स्व:तलाच Almighty वैगरे समजून शोषणाला सुरवात करतात।

तसेही आपल्याकडे थोर माणसांना "देवत्त्वाच्या" चौकटीत बसविण्याचा प्रयत्न कायमच होत राहिलेला आहे कारण या चतुर लोकांना पक्की कल्पना आहे की एकदा का एखाद्या माणसाला देव केले की "विचारांच्या सामर्थ्यावर होणारे मूल्यमापन मागे पडून भक्तीच्या वाटेने केले जाणारे गुणगान "चालू होते। भक्तीचा राग विचारांच्या लढाईत जिंकून नेतो। कृतीपेक्षा चमत्काराचे "Attraction " त्यात भर घालते।

म्हणजे बघा

ज्या "भिक्षुकशाहीच्या विरोधात " महात्मा फुल्यांनी आवाज उठवला त्यांची जयंती किंवा पुण्यथिति "सत्यनारायण "घालून , "फोटोची पूजा" करून अणि " प्रसादाच्या जेवणावळी घालून " साजरा करण्यासारखे त्यांच्या विचाराचा पराभव तो कुठला।
"रेड्याच्या तोंडून वेद म्हणून घेतले " किंवा " भिंत चालवून दाखविली " असल्या चमत्कारातच ज्ञानेश्वरांचे मोठेपण आहे असे मानणाऱ्या किती लोकांनी "पसायदान " किंवा "ज्ञानेश्वरी "समजण्याचा प्रयत्न केलेला असतो।
"कागदी लिहिता नामाची साखर /चाटिता मधुर गोदी नेदि। " असे "Practical "अभंग लिहणाऱ्या तुकोबांचे भक्त "पाण्डुरंगाचे" लाख लाख वेळेला नाव लिहा म्हणजे अमुक गोष्टी होतील , संकटे दूर होतील असे म्हणतात तेव्हा हसावे की रडावे हे कळेनासे होते।
पुरोगामी अणि सेक्युलर म्हणणारे लोक सावरकरांचा द्वेष करतात , पण " गाय ही केवळ उपयुक्त पशु आहे " किंवा "शेण अणि मलमूत्र यांच्या सहवासात गोठ्या मध्ये राहणाऱ्या गाईची पूजा सोवळे पा ळून, शुचिर्भूत झालेल्या बाईने का करावी " किंवा " ज्ञानेश्वरांनी जर भिंत चालवली असेल तर अलाउद्दीन खिल्जीच्या सैनिकांना त्यांना का रोखता आले नाही " या असल्या त्यांच्या प्रश्नांवर भले भले पुरोगामी प्रतिगामी होतात।
शिवाजीचा उल्लेख करताना "छत्रपती शिवाजी महाराज "असाच झाला पाहिजे असे आग्रहाने सांगत फिरणारे राज्यकर्ते जातिपातीचे राजकारण करण्यात इतके गुंतलेले आहेत की " रयतेचा उद्धार " किंवा " बहुत जनाचा आधार " असल्या भानगडित न पडता "मराठा " तितुका मेळवावा म्हणताना कुठला "महाराष्ट्र धर्म " जाणतात हे सर्वांना ठाऊक आहे त्यामुळे चांगले काम करणाऱ्या माजी मुख्यमंत्राची जात महत्वाची ठरते काम नव्हे।
थोडक्यात काय तर विचार अणि आचार या मध्ये समन्वय साधणे बऱ्याच लोकांना शक्य नसते तेव्हा देवत्त्वाची चौकट अणि नामस्मरणची सजावट जगणे सोपे करते।

आता तुम्ही म्हणाल सध्याच्या जागतीकरणाच्या युगात देखील "नामस्मरण " जरूरीचे ठरते का किंवा "सेक्स पासून संस्कारा पर्यन्त" खुल्लम खुल्ला चर्चा करणारी पिढी याच्या आहारी कितपत जाईल। त्याचे उत्तर " VUCA " या concept मध्ये आहे। Vulnerability , Uncertainty , Complexity अणि Ambiguity या चार गोष्टींनी आपले जग व्यापलेले आहे। संसाधने (Resources) &तंत्रज्ञान (Technology), संधी (Opportunities ) यांची असणारी मुबलक उपलब्धता, जगण्याची स्पर्धा (Competition) पण तितकीच तीव्र करत आहे. " दोन पंच अणि लंच " किंवा " दोन सह्या अणि वह्या " असे असणारे जॉबचे स्वरुप बदलून सतत नविन नविन स्किल आत्मसात करताना लागणारी गतिशीलता (Pace of life) ठेवताना होणारी दमछाक प्रत्येक तरुणाला किंवा तरुणीला विसावा शोधायला भाग पाडते। तो विसावा बहुतेकदा " नामस्मरणच " असते।

यातून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता तर म्हणजे " स्व:ची ओळख " अणि त्यासाठी केलेला प्रवास। व "एकमेका सहाय्य करुँ। अवघे धरु सुपंथ। " असे म्हणत चालणारे "participative" समाजजीवन पुन्हा अनुभवणे जे आपण मागे सोडून " जीवो जीवस्य जीवनम :" ( one living is food for another) हा जंगलाचा कायदयाचे पालनकर्ते झालो आहोत।

ज्यांना या पुराणातील गोष्टी वाटतील त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर सध्या जोरात असणारे "इकीगाई" हे जापनीज (Japanese ) तत्वज्ञान जरूर वाचावे। आनंदी अणि तणावमुक्त जीवनासाठी ज्याची सर्वात जास्त गरज आहे ते म्हणजे " आपला इकीगाई " शोधण्याची म्हणजे काय तेच " तू स्व :त ला ओळख अणि सर्वांशी प्रेमाने बंधुभावाने वाग "

थोडक्यात काय "बाबा नित्यानंदाच्या " भाषेत बोलायचे झाले तर " नामस्मरणाच्या आज़ारातून बरे होण्यासाठी वरचा उपाय म्हणजे " Breath of Solution " आहे , "Depth of solution " कळण्यासाठी चला निघुया प्रवासाला "स्व:तला ओळखायला। "

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

नामस्मरण न करणारे किती लोक अ‍ॅक्टीव्हली सामाजिक बदल घडवुन आणतात? त्यांचा वेळ ते कसे व्यतित करतात? यावर काही संशोधन झालेले आहे का?
नामस्मरण करा जेव्हा गोंदवलेकर महाराज सांगतात ते, सर्व काम धाम सोडून फक्त नाम लिहीत बसा असे नसून, दिवसातील १५ मिनीटे नामास वहा. एखादे काम करताना नाम मनात घ्या असा असतो.
निदान मूल्याधारीत शिक्षण तरी चांगले संत देतात. बाकी हे भंकस नित्यानंद बुवा वगैरे माहीत नव्हते ते बरे झाले कळले.
सदेही गुरु करुच नये कारण मग आपला ताबा आपण त्याच्या हाती देतो. त्यापेक्षा हयात नसलेल्या पण उत्तम चारित्र्याच्या संताची शिकवणूक जरुर आचरणात आणावी.
एकनाथ महाराजांची भूतदया, रामदासांचे व्यावहारीक चातुर्य, गोंदवलेकर महाराजांचे नामाचे प्रेम हे घेण्यात काय चूकीचे आहे?
____________
खरं तर आयुष्याचा अर्थ नक्की काय हा शोध घेत प्रत्येकच जण चाचपडत असतो, कोणी पैशात म्हणजे 'अर्थामध्ये' अर्थ शोधतात कोणी एखाद्या ध्यासाने झपटतो, कोणी काहीच न सापडल्याने गुरु काहीतरी सांगतील या आशेने नादाला लागतो. हे 'नादाला लागणे ' वाईट. म्हणुन सदेही गुरु करुच नये.

सामो सहमत. केवळ काही भोंदू बाबांमुळे संपूर्ण अध्यात्मच वाईट आणि त्याच्या नादाला लागूच नये हा एप्रोच एकदम चुकीचा आहे. असे एकही क्षेत्र नाही की जिथे फसवेगिरी नाही. अगदी नोबल मानले जाणारे वैद्यकीय क्षेत्र पण याला अपवाद नाही. कित्येकदा अनेकजण खोटी डिग्री घेऊन वैद्यकीय व्यवसाय करताना दिसतात किंवा अगदी खऱ्या डॉक्टरकडूनपण चुका झाल्याची अनेक उदाहरणे आहेत ज्यामुळे पेशंटचा जीवही दगावला आहे. लुटालुटीचे प्रकार तर वैद्यकीय क्षेत्रात सर्रास दिसून येतात. पण म्हणून उद्या आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जाणार नाही असे कोणी म्हणेल का? हे फक्त वैद्यकीय क्षेत्र नाही तर सर्वच क्षेत्राला लागू आहे जिथे फसवेगिरी स्वार्थ आहेच.
खरं तर भारतात शेकडो संत होऊन गेलेत जे खरोखर उच्च कोटीचे आहेत आणि त्याची माहितीपण अनेकांना असते. ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, रामदास स्वामी, स्वामी समर्थ, गोंदवलेकर महाराज, गुरुदेव रानडे, योगानंद, स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, रमण महर्षी अशी खरोखर अनेक उदाहरणे देता येतील जे खरोखर जेन्युईन होते आणि त्यांनी अध्यात्मिक मार्गही सांगून ठेवलेले आहेत. परंतु संतांनी दाखवलेल्या मार्गावर फार कमी लोक चालतात कारण लोकांना इन्स्टंट रिजल्ट हवा असतो तेही काही विशेष प्रयत्न न करता. आणि मग असे भोंदू बाबांच्या मागे लागतात आणि स्वतःचे नुकसान करून घेतात. यात दोष संतांचा किंवा त्यांनी दाखवलेल्या आध्यात्म मार्गाचा नाही तर लोकांचा आहे पण खापर मात्र अध्यात्मावर फोडणार.

त्याचे उत्तर " VUCA " या concept मध्ये आहे।
>>> हे काय आहे हे मराठीतून जरा सविस्तर समजावून सांगितले तर छान होईल. तसंच इकिगाई वर पण लिहाल काय?

सामो, छान प्रतिसाद. लेख चांगला आहे पण शीर्षकात '-नामस्मरणास' रोग'म्हणणं खटकलं. माणूस गैर असू शकतो पण नामस्मरण कसे काय गैर ठरू शकते?